श्रीनगरमध्ये चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू (ऑल इंडिया उपसंपादक राजन चौधरी) : श्रीनगरमधील दानमर भागातील अलमदार कॉलनी येथे जवान व दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक सुरू आहे. या चकमकीत लष्कर ए तोयबा संघटनेच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं आहे. काश्मीरचे आयजीपी विजय कुमार यांनी ही माहिती दिली आहे.

मागील काही दिवसांमध्ये सातत्याने जम्मू-काश्मीर व श्रीनगर भागात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमकी सुरू आहेत. कालच दक्षिण काश्मीरच्या पुलवामा येथे झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचा एक पाकिस्तानी कमांडर व त्याचे दोन साथीदार ठार झाले.

पुलवामा शहरात काही दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी मंगळवारी रात्री त्या भागाला वेढा घालून शोधमोहीम हाती घेतली होती. या मोहिमेदरम्यान नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येऊन दहशतवाद्यांचा नेमका ठावठिकाणा शोधण्यात आला आणि त्यांना शरण येण्याची संधी देण्यात आली. मात्र त्यांनी शोधपथकावर अंदाधुंद गोळीबार केला. सुरक्षा दलांनी याला प्रत्युत्तर दिल्यानंतर चकमक झडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here