टोकियो ऑलिंम्पिक : रशिया व ब्राझील संघातही कोरोनाने एन्ट्री

टोकियो : ऑलिम्पिक सुरू होण्यास खूप कमी कालावधी बाकी असताना अजूनही कोरोनाचे सावट वाढले आहे. स्पर्धेत सहभागी होत असलेल्या अनेक देशांतील संघाच्या खेळाडूंना आणि सपोर्ट स्टाफला कोरोनाची बाधा होत आहे. यजमान जपानच्या ऑलिम्पिक पथकातील एका खेळाडूला कोरोनाची बाधा झाल्याचे वृत्त आले असतानाच रशिया व ब्राझील संघातही कोरोनाने एन्ट्री घेतल्याचे समोर आले आहे. त्यामुळे स्पर्धेच्या आयोजनाला पुन्हा एकदा धक्‍का बसला असून स्पर्धेला विरोध करणारे जास्त आक्रमक झाले आहेत.

जपानच्या एका ऑलिम्पिकपटूसह ५ ऑलिम्पिक कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले होते. आता रशिया आणि ब्राझीलच्या संघातही कोरोनाने एन्ट्री केल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरोनाच्या वाढत्या धोक्‍यामुळेच गेल्या वर्षी होत असलेली ही स्पर्धा एक वर्ष पुढे ढकलण्यात आली होती.

जपान सरकार आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती येत्या 23 जुलैपासून स्पर्धा सुरू होणार असल्याचे सांगत असले तरीही कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. ऑलिम्पिक स्पर्धेतील खेळाडूंच्या हॉटेलच्या ८ कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here