कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटीतर्फे पोलीस पब्लिक लायब्ररीचा गौरव

पुणे (उपसंपादक वासंती देवळे) : कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटीतर्फे आयोजित शैक्षणिक परिषदेत ‘पोलीस पब्लीक लायब्ररी’या शैक्षणिक उपक्रमाचा गौरव करण्यात आला.दिल्लीत गरीब वस्तीत चालविल्या जाणाऱ्या या वाचनालयात २ हजारहुन अधिक पुस्तके आहेत.२१ हजार रुपयांचा धनादेश यावेळी देण्यात आला.

कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटी तर्फे ११ जुलै रोजी ‘कोविड पश्चात काळातील शिक्षण’ विषयावरील परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ही परिषद हॉटेल रॅडिसन येथे झाली. डॉ. रिपुरंजन सिन्हा यांनी ‘कोविड पश्चात काळातील उच्च शिक्षण’ या विषयावर मार्गदर्शन केले.डॉ. प्रियदर्शिनी नायक यांनी ‘कोविड पश्चात काळातील शालेय शिक्षण’ या विषयावर मार्गदर्शन केले .

कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटीचे संस्थापक राकेश मित्तल यांनी ‘किंगडम ऑफ टोंगामधील संशोधनाच्या संधी’ या विषयावर मार्गदर्शन केले. डॉ. योगेश चंदना (इव्हॅल्युएशन कमिशनर ऑफ इंटरनॅशनल ऍक्रिडिटेशन ऑर्गनायझेशन),साफी अख्तर (प्रशासकीय सचिव,ऑल इंडिया मिली कौन्सिल),अजयकुमार वाजपेयी (टाटा मोटर्स ), डॉ. प्रियदर्शिनी नायक ( सीईडी फाऊंडेशन ), डॉ. अबेद अल जफर ( पॅलेस्टाईन ),हे मान्यवर या परिषदेत उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here