निमगावजाळी गावात कृषी जागरूकता आणि औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमाला सुरुवात

शिर्डी (शहर प्रतिनिधी) : संगमनेर तालुक्यातील निमगावजाळी यागावी श्रमशक्ती कृषि महाविद्यालय, मालदाडची विद्यार्थी कृषिकन्या तांबे पुजा राजेंद्र हिने ग्रामीण कृषि जागरूकता आणि कृषि औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमाला सुरवात केली.

कार्यक्रमाच्या प्रारंभीच गावाचे सरपंच अमोल जोघंके, ग्रामविकास अधिकारी व्ही. डी. केवारी, कर्मचारी तांबे सुनिल, संगणक अधिकारी सुनिता डेंगळे तसेच ग्रामस्थ इतर पदाधिकारी त्याच्यासोबत भेट देवून गावाविषयी माहिती गोळा केली. त्यानंतर गावातील हागलाशेल शेतकरी संतोष बाळासाहेब तांबे यांच्या शेतात जावून पिकांचा आढावा घेतला.

पिकांतीला होणारा बदल माती परिक्षण, सेदिय पिक पद्धती बि-बियाणे, औषध फवारणी आदि विषयांवर मार्गदर्शन केले. तसेच पशु-पालनका एक शेती जोडधंदा म्हणून कसा वापरता येईल याची माहिती सांगितली. कृषिकन्येच्या पाव्यारीक कार्यक्रमासाठी तिचे आई-वडिल अमिक उदयोग समुहाचे अध्यक्ष साहेबराव नवले, प्राचार्य डॉ. अशोक कडलग, डॉ. अरविंद हारदे, समन्वयक प्रा. तायडे कार्यक्रम अधिकारी यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here