शिर्डीच्या प्रभाग क्रमांक ११ मध्ये विकासकामांना गती! सहा रस्त्यांच्या कामांचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन

शिर्डी

अहिल्यानगर (प्रतिनिधी संजय महाजन) । शिर्डी शहरातील प्रभाग क्रमांक ११ मध्ये विविध विकासकामांना गती मिळत असून, प्रभागातील सहा रस्त्यांच्या कामांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. मा. नामदार श्री. राधाकृष्ण विखे पाटील व मा. खासदार श्री. सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला.

प्रभाग क्रमांक ११ मधील नागरिकांच्या दैनंदिन सोयीसुविधा अधिक चांगल्या व्हाव्यात, तसेच परिसरातील रस्त्यांची समस्या दूर होऊन नागरिकांना ये-जा करण्यासाठी सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने सहा रस्त्यांच्या कामांना सुरुवात करण्यात आली आहे. या कामांसाठी नामदार राधाकृष्ण विखे पाटील व खासदार सुजयदादा विखे पाटील यांनी प्रभाग क्रमांक ११ साठी भरीव निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रभागातील नागरिकांनी त्यांचे आभार मानले.
शिर्डी शहरातील विविध प्रभागांमध्ये विकासकामे सुरू असताना प्रभाग क्रमांक ११ मध्ये रस्त्यांच्या कामांसाठी निधी उपलब्ध झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. रस्त्यांची कामे पूर्ण झाल्यानंतर परिसरातील वाहतूक अधिक सुलभ होण्यास मदत होणार असून, नागरिकांना दैनंदिन प्रवासात दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
या उद्घाटनप्रसंगी शिर्डी शहराच्या नगराध्यक्ष मा. जयश्रीताई थोरात, बांधकाम सभापती श्री. अरविंद आप्पा कोते पाटील, गटनेत्या सौ. प्रतीक्षाताई किरण कोते, नगरसेविका सौ. छायाताई सुधीर शिंदे, नगरसेवक श्री. धनराज कैलास बापू कोते पाटील यांच्यासह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी प्रामुख्याने श्री. सदाशिवराव सजन, श्री. उत्तमराव सजन, श्री. सुधीर भाऊ शिंदे, श्री. गोपाला वैद्य, श्री. बाळासाहेब सजन, श्री. सोन्याबापू शिंदे, श्री. ज्योतीलाल जाधव, पत्रकार श्री. राहुल फुंदे, श्री. सीताराम जेजुरकर, श्री. विश्वनाथ कोळगे, श्री. मच्छिंद्र सजन, श्री. रोहित जेजुरकर, श्री. अभिषेक शिंदे, श्री. संतोष जेजुरकर, श्री. प्रथमेश सजन, श्री. चंद्रभान जेजुरकर, श्री. ऋषिकेश सजन, श्री. अनिल सोनवणे, श्री. विजय जेजुरकर, श्री. प्रणव वाणी, श्री. सार्थक सोनवणे, श्री. चैतन्य सजन, श्री. उदय जेजुरकर, श्री. राजेंद्र ब्राह्मणे, श्री. भाऊसाहेब शेजवळ, श्री. सुनील कनगरे आदी मान्यवर व नागरिक उपस्थित होते.
प्रभाग क्रमांक ११ मधील सहा रस्त्यांच्या कामांना सुरुवात झाल्याने परिसरातील पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना मिळणार आहे. या विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल नामदार राधाकृष्ण विखे पाटील व खासदार सुजयदादा विखे पाटील यांचे प्रभागातील नागरिकांनी आभार व्यक्त केले. तसेच ही कामे दर्जेदार पद्धतीने व निर्धारित वेळेत पूर्ण व्हावीत, अशी अपेक्षाही नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here