जळगाव (क्राइम रिपोर्टर असलम खान /शाहिद खान) : यावल येथील सराफी दुकानावर बंदुकीच्या धाकावर जबरी चोरी केल्याच्या गुन्हातील फरार आरोपी भुसावळ बाजारपेठ पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
रुपेश उर्फ भनभन अशोक चौधरी (.श्री राम नगर भुसावळ.) असे अटक करण्यात आलेल्या संशयीत आरोपी चे नाव आहे. या प्रकरणी यावल पुलिस स्टेशनला भाग ५ गु,रा,न.१२१/२०२१ भा.द.वि. ३९२ तसेच आर्म अक्ट ३/२५ नुसार गुन्हा दाखल आहे.
भुसावळ उप विभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली खाली, पो,नि दिलीप भगवत व त्यांच्या सहका-यांनी आज सकाळी फरार संशयीत रूपेश उर्फ भनभन अशोक चौधरी यास त्याचा रहत्या घरातुन सापळा रचुन ताब्यात घेतले . त्याला यावल पोलिसंच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पोलिस निरीक्षक दिलीप भगवत यांच्यासह पो.नि रविंद्र बिरृहाडे, रमन सूरळकर, उमाकांत पाटिल, पो. क. सातदिवे, प्रशांत परदेशी, ईश्वर भालेराव, श्री कृष्ण देशमुख, योगेश माळी, परेश बिरहाडे,आदिंनी या कारवाईत सहभाग घेतला.






