मुंबई(कुलाबा) (प्रमिला जाधव) – फोर्ट येथील कुमारी स्नेहा झोरे हिने मिळवले दहावीत 95.20 % घवघवीत यश केतन खेडेकर फोर्ट येथिल शिवसेना पदाधिकारी शंकर झोरे यांची कन्या स्नेहा झोरे हिला शालांत परिक्षा दहावी मध्ये 95.20% गुण मिळवत घवघवीतपणे यश संपादित केले.त्याच्या या कामगीरी साठी माजी उपविभाग प्रमुख विकास मयेकर, सुरेश कोळी, भगवान कोळी यांनी त्याचे अभिनंदन करत पुढिल वाटचालीस शुभेच्छा दिल्या त्याच बरोबर आम्हांला स्नेहा हीचा खूप अभिमान असून तिला डॉक्टर बनायचे आहे तिचे स्वप्न भविष्यात पूर्ण होवोत अशी मी मनोकामना करतो अशी माहिती उपविभाग प्रमुख विकास मयेकर यांनी दिली. स्नेहा झोरे यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत असून अनेकांनी तिला पुष्कगुच्छ आणि पेढे देऊन कौतुक केले.







