बंदुकीचा धाक दाखवत गुंडांनी पळवली पोलिसांचीच गाडी

जयपूर : गुन्हेगारांनी थेट बंदुकीचा धाक दाखवत पोलिसांचीच गाडी पळवल्याची घटना या ठिकाणी घडली आहे. गुन्हेगारांनी एसएचओ आणि हेड कॉन्स्टेबल यांच्यावर गोळ्या चालवत त्यांची गाडी लूटली. या दरम्यान हेड कॉन्स्टेबल जखमी झाली. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

जयपूरमध्ये तैनात असलेले सीआय नरेंद्र खिंचड आणि हेड कॉन्स्टेबल मनेंद्र यांच्यासोबत घडलेल्या या घटनेनंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. सीकरच्या रानोली येथे जयपूर डीएसटी वेस्ट प्रभारी नरेंद्र खिंचड आणि हेड कॉन्स्टेबल मनेंद्र हे सोमवारी रात्री एका ढाब्यावर जेवणासाठी थांबले होते. त्यावेळी त्या ठिकाणी बसलेल्या दोन जणांनी पोलिसांना बंदूकीचा धाक दाखवत गाडीची जावी मागितली.

ज्यावेळी त्यांनी आपण पोलीस असल्याचं सांगितलं त्यावेळी गुंडांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात मनेंद्र हे जखमी झाली. परंतु परिस्थिती पाहता दोघांनीही गुंडांना गाडीची जावी दिली. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच सीकर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मनेंद्र यांना जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात दाखल केलं. या गुन्हेगारांचा शोध सध्या पोलीस घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here