आईच्या व्यसनाला कंटाळून मुलानेच गळा दाबून केली आईची हत्या

ठाणे (सहसंपादक सतीश बनसोडे) : आईच्या दारु पिण्याच्या व्यसनामुळे घरातील होणाऱ्या सततच्या भांडणांना कंटाळून पश्चिमेच्या कोळीवाडा येथील एका अठरा वर्षे वयाच्या मुलाने आपल्या जन्मदात्या आईची गळा आवळून हत्या केली आहे. मंगळवारी रात्री ही घटना घडली.

याबाबत समजलेली माहिती अशी की, वसई पश्चिमेच्या कोळीवाडा येथील आयुष अपार्टमेंटमधील मेरी यादव (वय ५९) ही महिला मुलगा सनी (१८) व मुलगी पूजासोबत राहत होती. मेरी हिच्या पतीचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले आहे. मेरीला दारूचे व्यसन असल्यामुळे घरात सतत या गोष्टीवरून वाद-विवाद होत होते. मंगळवारी या वादातून मुलगा सनीने रात्री पावणे दहाच्या सुमारास चामड्याच्या पट्ट्याने आईचा गळा आवळून खून केला. वसई पोलिसांनी आरोपी सनीला हत्येच्या गुन्ह्यात अटक केली आहे.

सनीचे बारावीपर्यंत शिक्षण झालेलं आहे. आईला असलेले मद्याचे व्यसन आणि त्यामुळे घरात सतत होणारी भांडणं यामुळे सनीने ही हत्या केल्याचे वसई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणराव कर्पे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here