रत्नागिरीतील तरूणांनी बनवलं भन्नाट ॲप

ऑफलाईन लेक्चर ते गृहपाठ देण्यापर्यंतची सोय!

अलिबाग सोगावकर – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या सरकार, पालक, शाळा, क्लासेस यांची पसंती ही ऑनलाईन शिक्षणाला दिसून येत आहे. विद्यार्थ्यांचं शिक्षण थांबू नये, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा ताण वाढू नये हाच यामागील उद्देश. पण, ग्रामीण भागात सध्या इंटरनेट सुविधा, पालकांकडे अद्ययावत मोबाईल नसणे यासारख्या समस्यांचा देखील सामना करावा लागत आहे. त्यामुळे अनेक भागात ऑनलाईन शिक्षणाचा बोजवारा उडालेला पाहायाला मिळत आहे. विद्यार्थ्यांचं शिक्षण, गृहपाठ या साऱ्या समस्या देखील आल्याच. पण, रत्नागिरीतील दोन इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांनी तयार केलेलं ॲप या साऱ्या प्रश्नांची उत्तरं देताना दिसून येत आहे.
प्राथमिक शिक्षण आपल्या कोकणातील मुळगावी, त्यानंतर मुंबई- पुणे असा प्रवास अमेरिकेत इंजिनिअरिंग पूर्ण केलेले दोन मित्र देशात असलेली ऑनलाईन पद्धत आणि त्यामध्ये येत असलेल्या समस्या यांचा विचार करत त्यांनी क्लेवर ग्राऊंड  हे ॲप तयार केले आहे. या ॲपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणामध्ये अडथळा येणार नाही, याबाबत सारी खबरदारी घेतल्याची माहिती या ॲपचा निर्माता सिद्धार्थ पात्रे देतो.
‘अमेरिकेत शिक्षण घेत असताना त्या ठिकाणची ऑनलाईन शिक्षण पद्धत आणि आपल्या देशातील शिक्षण पद्धत यामध्ये बराच फरक दिसून आला. विद्यार्थ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. भविष्याचा विचार करत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत मी अमेरिकेतून भारतात येण्याचा निर्णय घेतला. साऱ्या परिस्थितीचा विचार करत क्लेव्हर ग्राऊंड हे ॲप तयार केले. त्याला सध्या प्रतिसाद देखील चांगला मिळत असल्याचं सिद्धार्थ सांगतो. तर, यावर आम्ही थांबणार नाही. या ॲपच्या माध्यामातून आमचे भविष्यात इतर देखील काही प्लॅन्स आहेत. करिअर गाईडन्सपासून इतर देखील पर्याय आम्ही या ॲप्सच्या माध्यमातून देणार असल्याची प्रतिक्रिया सौरभ सुर्वे यानं दिली. लोकल फॉर व्होकल, मेक इन इंडिया या उपक्रमाचा आम्हाला फायदा नक्कीच होईल. शिवाय, आपल्या माणसांकरता काहीतरी करता येत असल्याचं समाधान वाटत असल्याची प्रतिक्रिया या दोन्ही तरूणांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here