शतकोत्तरी पी.आर.हायस्कूलची विद्यार्थिनी काजल बिचवे गणितात शंभरपैकी शंभर गुण मिळवून महाराष्ट्रात प्रथम

धरणगाव (योगेश पी.पाटील) – यशाची आणि गुणवत्तेची उज्ज्वल परंपरा सातत्याने कायम राखणाऱ्या शतकमहोत्सवी पी. आर.हायस्कूलची विद्यार्थिनी कु. काजल संतोष बिचवे या खत्री गल्लीतील विद्यार्थिनीने दहावीच्या परीक्षेत गणित या विषयात ???? पैकी ???? गुण मिळवून गणित या विषयात महाराष्ट्रात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.
काजलने ९५.६० टक्के गुण मिळवून शाळेत द्वितीय स्थानी येण्याचाही मान मिळवला आहे. तिला गणित विषयाचे तज्ज्ञ शिक्षक श्री. सुरेंद्र प्रकाश सोनार यांचे मार्गदर्शन लाभले. काजल ही योगी काॅर्नर या प्रतिष्ठानचे मालक श्री.संतोष सनातन बिचवे यांची कन्या असून ते सुद्धा पी. आर. हायस्कूलचेच माजी विद्यार्थी आहेत.काजलच्या यशाबद्दल तिचे पी.आर.हायस्कूल सोसायटीचे अध्यक्ष माननीय डॉ. अरुण कुलकर्णी, उपाध्यक्ष माननीय वसंतराव गालापुरे सर, मानद सचिव माननीय डॉ. मिलिंद डहाळे व सर्व संचालक मंडळ तथा मुख्याध्यापक श्री. एस. एम. अमृतकर, उपमुख्याध्यापक डॉ. संजीवकुमार सोनवणे, पर्यवेक्षक श्री. आर. के. सपकाळे यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here