टोकियो ऑलिम्पिक : पहिल्याच दिवशी वेटलिफ्टिंगमध्ये ४९ किलो वजनी गटात भारताच्या मीराबाई चानूला रौप्यपदक


टोकियो : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी उद्‌घाटन झाल्यानंतर टोकियो ऑलिंम्पिकच्या पहिल्याच दिवशी भारताच्या खेळाडूने रौप्यपदक पटकावले आहे.

वेटलिफ्टिंगमध्ये ४९ किलो वजनी गटात भारताच्या मीराबाई चानूने देशाला पहिले पदक मिळून दिले. मीराबाईने एकूण २०२ किलो वजन उचलले. या प्रकारात चीनच्या खेळाडूने सुवर्णपदक जिंकले.

मीराबाईला गेल्या रिओ ऑलिम्पिकमध्ये अपयश आले होते. त्यानंतर तिच्यावर टीका देखील झाली होती. पण गेल्या चार वर्षात मीराबाईने कठोर मेहनत घेतली आणि त्याचे यश आज टोकियो ऑलिम्पिकमध्ये मिळाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here