ग्रीन फाउंडेशनतर्फे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

शिर्डी (प्रतिनिधी तुषार महाजन) छ लोणी काळभोर परिसरात ग्रीन फाउंडेशन च्या वतीने वनसंवर्धन दिन गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आला. वनसंवर्धन दिन, गुरुपौर्णिमाच्या निमित्ताने हवेली तालुका पत्रकार संघ अध्यक्ष श्री.राजेंद्र बापूसाहेब काळभोर यांच्या शुभहस्ते तीर्थक्षेत्र रामदरा लोणी काळभोर येथे वृक्षारोपण करण्यात आले.

लोणी काळभोर पृथ्वीराज कपूर हायस्कूल येथे परमपूज्य डॉ.बापूजी साळुंखे व समाजभूषण गणपतराव काळभोर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल मुख्याध्यापक गवळी सर, समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालय प्रा.कुरणे सर , साधना सहकारी बँक मा.व्हा.चेअरमन बाळासाहेब कोळपे, हवेली तालुका पत्रकार संघ अध्यक्ष श्री.राजेंद्र बापूसाहेब काळभोर यांस ग्रीन फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष अमित जगताप यांच्या शुभहस्ते शाल नारळ देऊन सर्व शिक्षक गुरूजन सोबत गुरुपौर्णिमा, वनसंवर्धन दिन साजरा करण्यात आला.

green-foundation-shirdi

यावेळी ग्रीन फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष अमित जगताप, विश्वजीत काळभोर, मयुर चौधरी, बिरूदेव भास्कर, जीवन जाधव, किरण बाचकर, राहुल कुंभार , किरण भोसले, विजय बोडके, तसेच विभा गिरिश ट्रस्ट पुणे, जनाई शिक्षण संस्था पुणे, लोणी काळभोर ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here