पॉवर ऑफ मीडियाच्या अमरावती महानगराची कार्यकारणी जाहीर

  • अध्यक्ष पदी सुरेंद्र बिसने, मंजू ठाकरे तर सचिव सतीश वानखडे, मीनाक्षी कोल्हे
  • वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या अध्यक्ष पदी अरविंद लुंकड
  • महानगर उपाध्यक्षा पदी सुधीर गणवीर, प्रवीण शेगोकार व लता अंबुलकर
  • महानगर कार्यालयाच्या प्रमुख पदी गजानन जिरापुरे

अमरावती (विशेष प्रतिनिधी) – पॉवर ऑफ मीडिया फाउंडेशनच्या अमरावती महानगर कार्यकारिणीची नुकतीच बैठक रुख्मिणी नगर येथे पार पडली. पॉवर ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष उमेश लोटे यांच्या मार्गदर्शनात अमरावती शहर अध्यक्ष पदी सुरेंद्र बिसने यांची तर महिला अध्यक्ष पदी मंजू संजय ठाकरे यांची तर वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या अध्यक्ष अरविंद लुंकड यांची सर्वानुमते अविरोध निवड करण्यात आली, त्याचबरोबर सचिव पदी सतीश वानखडे व मीनाक्षी कोल्हे तर उपाध्यक्ष पदी सुधीर गणवीर, प्रवीण शेगोकार व लता अंबुलकर तर महानगर कार्यालयाच्या प्रमुख पदी गजानन जिरापुरे यांची अमरावती महानगर कार्यकारणीत एकमताने नियुक्ती करण्यात आली आहे. यादरम्यान महानगरातील नवनिर्वाचित पत्रकारांनी पत्रकार संघटनेत जाहीर प्रवेश घेऊन पॉवर ऑफ मीडियाचे हात बळकट केले आहे.
यावेळी पॉवर ऑफ मीडियाचे राज्य संघटक संदीप बाजड यांच्या अध्यक्षतेखाली हि सभा पार पडली असून या बैठकीला विभागीय अध्यक्ष उत्तम ब्राम्हणवाडे, विभागीय सदस्य अमोल नानोटकर, प्रसिद्धी प्रमुख फणींद्र वाडकर यांच्या उपस्थित होते. या छोट्या खाणी कार्यक्रमाला साहित्यिक कवी पदमाकर मंदवधरे, विलास फरकाडे, फोटोग्राफर प्रदीप इंगोले, विक्की बाबुळकर, पवन श्रीवास्तव, योगेश श्रीवास्तव यांच्यासह आदी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here