पद्मालय नगर येथे दिवसाढवळ्या प्रा. मंगेश पाटील यांचे घर फोडले

जळगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) : सोमवार दि. २६ जुलै, २०२१ सोमवार रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास धरणगाव येथील पद्मालय नगर येथे प्राध्यापक मंगेश पाटील यांचे घर बंद पाहून काही अज्ञात चोरट्यांनी चोरी केली..

प्रा. मंगेश पाटील यांचे आई वडील गावाला गेले असतांना व सर कॉलेजला गेले असताना भर दुपारी घरी कोणी नसतांना काही फेरीवाले व अज्ञात चोरटे यांनी घर बंद पाहून दुपारी १ वा. घर फोडले. कपाटातील सामान अस्ताव्यस्त केले. प्राध्यापक मंगेश पाटील हे कॉलेजहून घरी परत आल्यावर त्यांनी घर उघडे पाहिले घरात घुसताक्षणी त्यांना सर्व अस्ताव्यस्त पसारा दिसला, कपाट उघडे दिसले, साहित्यिक तिकडे पडलेले दिसले, कपाटातील पाच हजारापर्यंत ची रोकड गायब होती. सामान अस्ताव्यस्त केलेले आढळले.

प्रा. मंगेश पाटील यांनी तात्काळ पोलीस स्टेशन गाठले व धरणगाव पोलीस ठाण्याचे पी.आय.साहेब यांना लेखी तक्रार अज्ञाताविरूद्ध दिली. व लवकरात लवकर अज्ञात चोरट्यांना शोधून काढून मला न्याय मिळावा ही विनंती केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here