पोयनाड येथे कोवीड लसिकरणाचे शुभारंभ

रायगड (प्रतिनिधी विनया मेढेकर) : मंगळवार २७/७/२०२१ रोजी ग्रुप ग्रामपंचायत पोयनाड येथे कोवीड १९ लसिकरण सुरू करण्यात आले आहे. रायगडचा बुलंद आवाज आणि माजी राज्यमंत्री मिनाक्षीताई पाटील मॅडम यांच्या शुभहस्ते सदर लसीकरण कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी चित्राताई पाटील रायगड जिल्हा परिषद सदस्या, प्रमोदजी ठाकूर सभापती पंचायत समिती अलिबाग, सौ.शकुंतला काकडे सरपंच ग्रुप ग्राम पंचायत पोयनाड, सचीन पाटील उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत पोयनाड सुनील पाटील सदस्य ग्रुप ग्रामपंचायत पोयनाड अजीत चवरकर ग्राम पंचायत सदस्य ‌ग्राम पंचायत सदस्य सर्व माजी सरपंच भूषण चवरकर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश जैन सामाजिक कार्यकर्ते दिलीप काकडे, शैलेंद्र गायकवाड, प्रेमनाथ म्हात्रे नवेनगर रोहन धुमाळ, राजेंद्र जाधव विजेंद्र उर्फ बाबू तावडे माजी ग्राम पंचायत सदस्य पोयनाड हे मान्यवर उपस्थित होते.

ग्रुप ग्राम पंचायत पोयनाड येथे लसीकरण सुरू करण्यासाठी सर्वात मोलाचा वाटा अॅड‌. अस्वादजी पाटील (पप्पूशेठ) जिल्हा परिषद सदस्य यांचा आहे. सदर कार्यक्रमासाठी डॉ. आंटेश्वर वैद्यकीय अधिकारी प्रा.आ.केंद्र पोयनाड, भक्ती पाटील CHO, कृतीका पाटील ग्राम सेविका, सर्व ग्रामपंचायत कर्मचारी वृंद सर्व ग्रामस्थ व व्हॅक्सिन घेणारे सर्व लाभार्थी तसेच सर्व आरोग्य सेवक/सेविका आरोग्य सहाय्यक/सहाय्यिका सर्व शिक्षकवृंद सर्व आशा स्वयंसेवीका उपस्थित सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here