उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथे ट्रकने ट्रॅव्हल बसला दिलेल्या धडकेत १८ जणांचा मृत्यू

barabanki-accident-18-dead

बाराबंकी : उत्तरप्रदेशातील अयोध्या-लखनऊ महामार्गावर बाराबंकी येथे ट्रकने ट्रॅव्हल बसला दिलेल्या धडकेत बससमोर झोपलेल्या १८ मजूरांचा चिरडून मृत्यू झाला आहे. काही मजूर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं आहे. लखनऊमधील ट्रॉमा सेंटरमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व मजूर बिहारचे आहे. हे मजूर हरियाणामधून परतत असताना त्यांची बस मंगळवारी रात्री हायवेवर बंद पडली. यामुळे ते हायवेवरच बससमोर झोपले होते. ट्रकने बसला जोरदार धडक दिल्याने बस या मजुरांच्या अंगावर गेली आणि त्यांचा मृत्यू झाला. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here