कोलंबो : श्रीलंकेतील प्रेमदासा मैदानावर आज (दि.२९) अंतिम सामना रंगणार आहे. श्रीलंका दौर्यावर वनडे मालिका २-१ ने जिंकल्यानंतर शिखर धवनच्या नेतृत्वात टीम इंडियाला टी-२० मालिका जिंकण्याची आज उत्तम संधी आहे.
भारत विरुद्ध श्रीलंका टी २० मालिकेच्या अंतिम सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ ने बरोबरी आहे. त्यामुळे आजचा सामना जिंकत मालिका खिशात घालण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असणार आहे.
Hello & Good Evening from Colombo! 👋#TeamIndia have won the toss & elected to bat against Sri Lanka in the third & final #SLvIND T20I of the series.
Follow the match 👉 https://t.co/E8MEONwPlh
Here's India's Playing XI 👇 pic.twitter.com/QaQL0664Z9
— BCCI (@BCCI) July 29, 2021
भारतीय संघ : शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), मनीष पांडे, हार्दिक पंड्या, नितीश राणा, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), यजुर्वेंद्र चहल, राहुल चहर, कृष्णप्पा गौथम, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, दीपक चहर, नवदीप सैनी, चेतन साकारिया.
श्रीलंका संघ : दासुन शनाका (कर्णधार), धनंजय डि सिल्वा, अविष्का फर्नांडो, भानुका राजपक्षा, पथुम निसांका, चरित असालांका, वानिदू हसरंगा, असीन बंडारा, मिनोद भानुका, लाहिरू उदारा, रमेश मेंडिस, चमिका करुणारत्ने, बिनुरा फर्नांडो, दुश्मंथा संदाकन, अकिला धनंजया, शिरन फर्नांडो, धनंजय लक्षण, ईशान जयरत्ने, प्रवीण जयविक्रमा, असिथा फर्नांडो, कसुन रजिता, लाहिरु कुमारा, इसुरु उदाना.






