शहादा (प्रतिनिधी सुशील गव्हाणे) : शहादा तालुक्यातील बामखेडा येथे गुरुवारी शहीद जवान निलेश महाजन ह्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
सीमेवर झालेल्या एका चकमकीत निलेश महाजन ह्यांना गोळी लागून गंभीर दुखापत झाली होती .गेली अनेक महिने त्यांच्यावर शासकीय इस्पितळात उपचार सुरू होता अखेर त्यांची मृत्यूशी झुंज संपली.अतिशय कमी वयात सेवेत रुजु होऊन वयाच्या अगदी २६ व्या वर्षी त्यांना वीरमरण आले.त्यांच्या मृत आत्म्यास शांती मिळावी म्हणून बामखेडा येथे सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन त्याना श्रद्धांजली वाहिली.
सचिन सोनवणे ह्या तरूणाने जमलेल्या ग्रामस्थांना निलेश महाजन ह्यांचा जीवन प्रवास सांगितला. जमलेल्या सर्व नागरिकांनी शहिद निलेश महाजन ह्यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्प अर्पण केले. सदर प्रसंगी गावातील सर्व जेष्ठ नागरिक तसेच तरुण मित्र मोठ्या प्रमाणात हजर होते.






