कृणाल पंड्या पाठोपाठ युझवेंद्र चहल, के. गौतमला कोरोना

कोलंबो : श्रीलंका दौऱ्यासाठी गेलेल्या भारतीय क्रिकेट संघातील कृणाल पंड्यासह अजून दोन खेळाडूंना कोरोना झाला आहे. पहिली टी २० मॅच झाल्यानंतर कृणाल पंड्याला कोरोना झाल्याचे लक्षात आले. कृणाल आणि त्याच्या संपर्कात आलेल्या आठ खेळाडूंना क्वारंटाइन करण्यात आले. या आठपैकी युझवेंद्र चहल आणि के. गौतम या दोघांना कोरोना झाला आहे. सध्या कृणाल पांड्या, युझवेंद्र चहल, के. गौतम हे भारतीय क्रिकेटपटू कोलंबोतील आयसोलेशन सेंटरवर क्वारंटाइन आहेत. डॉक्टरांच्या देखरेखीत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

कृणाल पंड्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने दुसरा टी-२० सामना एक दिवसासाठी पुढे ढकलण्यात आला होता. तसेच टीम इंडियाच्या आठ खेळाडूंना आयसोलेट करण्यात आले होते. युझवेंद्र चहल आणि कृष्णप्पा गौथम हे दोघेही आयसोलेट होते. या दोघांची पहिली कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती, मात्र दुसऱ्या चाचणीत दोघेही पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे पंड्यासोबत या दोघांनाही श्रीलंकेतच थांबावे लागणार असून इतर खेळाडू भारताकडे रवाना होतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here