अनिल देशमुखांसह पत्नी आणि मुलाला ईडीकडून समन्स

चौकशीला हजर न राहिल्यास ईडी कठोर कारवाई करण्याच्या तयारीत

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुली प्रकरणी ईडीचा लागलेला ससेमिरा संपण्याची काही चिन्हे नाहीत.ईडीकडून अटक टाळण्यासाठी अनिल देशमुख या कोर्टातून दुसऱ्या कोर्टात धावाधाव करत आहे. मात्र या पार्श्वभूमीवर ईडीने पुन्हा एकदा अनिल देशमुख यांच्यासह त्यांचा – मुलगा ऋृषीकेश आणि पत्नीला देखील समन्स बजावला आहे.

या समन्समध्ये येत्या सोमवारी चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. एवढंच नाहीतर अनिल देशमुख यांचा मुलगा ऋृषीकेश आणि पत्नीला देखील समन्स बजावलं असून चौकशीला हजर न राहिल्यास ईडी कठोर कारवाई करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान देशमुख कुटुंबिय अजूनही नॉट रिचेबल आहेत. त्यामुळे सोमवारी अनिल देशमुख ईडीच्या चौकशीला हजर राहणार का? हे प्रश्नचिन्ह कायम आहे. अनिल देशमुखांविरोधात सीबीआयचा तपास वेगानं सुरु असून, या प्रकरणाचा तपास करण्यासाठी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं सर्वांत मोठी छापेमारी मोहिम राबवली आहे. अनिल देशमुखांविरोधात असलेल्या वसुली आणि भ्रष्टाचार प्रकरणात ही कारवाई सीबीआयमार्फत करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here