विकेंड लॉकडाऊनचा एक दिवस रद्द होण्यासह पुण्यातील दुकाने होणार रात्री ८ ला बंद – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : आज (दि.३०) पुणे महानगरपालिका हद्दीत वनाज ते आयडीयल कॉलनी दरम्यान शुक्रवारी ट्रायल रन घेण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. लॉकडाऊनविषयीच्या प्रश्नाला उत्तर देतांना त्यांनी सांगितले की, पुण्यात आता रात्री ८ वाजेपर्यंत दुकाने सुरु राहणार असून, विकेंड लॉकडाऊनमधील एक दिवस रद्द करण्याविषयी मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे.

या चर्चेत मुख्यमंत्र्यांनी याला सकारात्मकता दर्शविली असून, पुणेकरांनी मात्र कोरोनासंदर्भातील नियमांचे तंतोतंत पालन करणे गरजेचे आहे. याबाबतचे आदेश लवकरच निघतील, असेही यावेळी बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

मात्र याचवेळी ग्रामीण भागात मात्र कोरोना नियमांचे पालन होत नसल्याने कोरोना रूग्णांची संख्या अजूनही वाढत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांनी स्वत:ची जबाबदारी समजून आणि स्वत:च्या रक्षणासाठी काळजी घ्यायला हवी, असे सांगत, उपमुख्यमंत्री पवार यांनी ग्रामीण भागात निर्बंध कायम राहणार असल्याचे संकेत दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here