चतुर्थ श्रेणीमधील आरोग्य विभागातील सहा कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेतल्याचा आदेश जारी

इचलकरंजी (महाराष्ट्र सह संपादक मनोज सोनवले) : सफाई कर्मचाऱ्यांनी स्वच्छतेच्या कामात विशेष लक्ष देण्याची गरज असे उद्देशून शुक्रवार (दि.३०) रोजी चतुर्थश्रेणीतील सहा कर्मचाऱ्यांना कायम सेवा आदेश पत्राचे वितरण उपनगराध्यक्ष तथा पक्षप्रतोद..भा.ज.पा..तानाजी पोवार यांनी केले.

आरोग्य विभागातील सहा कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेतल्याचा आदेश आज जारी करण्यात आले व त्या आदेश पत्राचे वितरण इचलकरंजी नगरीचे उपनगराध्यक्ष तथा पक्षप्रतोद..भा.ज.पा. तानाजी पोवार व मा.उपनगराध्यक्ष.रवी रजपुते यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार बोलतांना उद्देशून या कर्मचाऱ्यांसह पालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या हितासाठी मा. उपनगराध्यक्ष रजपुते यांनी पालिकेकडे वेळोवेळी पाठपुरावा केला.शिवाय, कर्मचाऱ्यांनी ही डोळ्यात तेल घालून आपले कर्तव्य चोखपणे बजावले पाहिजे,असे ही त्यांनी स्पष्ट केले.रवी रजपुते सोशल फाउंडेशन व अमोल उगारे सोशल फाउंडेशन च्या वतीने या सहा कर्मचाऱ्यांच्या कायम सेवेसाठी तात्काळ आदेश निघावा, म्हणून विशेष प्रयत्न केले आहेत. शिवाय, त्यासाठी मा.उपनगराध्यक्ष रवी रजपुते यांनी सतत पाठपुरावा ही केला आहे. त्या कामात यश मिळाले. अभिनंदन सुभाष कांबळे, संतोष सरदार सावंत, विजय राजेंद्र कांबळे,हर्षवर्धन दयानंद कांबळे,प्रशांत महावीर कांबळे,राज रविंद्र कांबळे या सहा कर्मचाऱ्यांना कायम सेवेचा आदेश जारी झाल्याने पालिका कर्मचारी वर्गात श्री. रजपुते यांच्या कामाबाबत समाधान चे वातावरण पसरले आहे. या सहा कर्मचाऱ्यांना प्रत्येकी साडेतीन हजार ची मासिक वेतनवाढ मिळणार आहे.

नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या सर्व प्रकारच्या कामासाठी आपण अहोरात्र प्रयत्नशिल राहणार आहे. पालिका कर्मचाऱ्यांनी त्यांच्या न्याय हक्कासाठी लढताना रवी रजपुते सोशल फाउंडेशन व अमोल उगारे सोशल फाउंडेशन नेहमीच सोबत राहील,अशी ग्वाही मा.उपनगराध्यक्ष रवी रजपुते यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here