न्यू इंग्लिश स्कूल तळसर दहावीचा निकाल जिल्ह्यात १०० टक्के, जिल्ह्यात पटकावला दुसरा क्रमांक

न्यू इंग्लिश स्कुलच्या घवघवीत यश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थिनी.
वैष्णवी योगेश गायकवाड ९४.४० %
श्रद्धा शैलेश कदम ८६.२० %
सिद्धी संदीप लाड ८०.८४ %

मुंबई (प्राजक्ता अरूण चव्हाण) – रत्नागिरी जिल्ह्यात आणि चिपळूण तालुक्यात अतिशय दुर्गम भागात वसलेले गाव तळसर त्याकाळी प्रवासाचे साधन, वीज, साकव अशा अनेक सुविधा नसल्यामुळे गावातील विद्यार्थी सातवी नंतर पुढील शिक्षणाकरिता दोन तास जंगलातून पायी प्रवास करत दुसऱ्या गावात जात असत. हे सर्व तळसर गावचे विविध पैलू अंगी असणारे कालकथित गणपत विठ्ठल मोहिते यांच्या लक्षात आले. त्यांनी अखंड गावाची संघटना तयार केली जेणेकरून त्या संघटनेच्या माध्यमातून गावाचा विकास करता येईल. काही दिवसांनी गणपत विठ्ठल मोहिते यांनी गावासमोर हायस्कूल विषयी प्रस्ताव मांडला. एकीकडे त्यांच्या प्रस्तावास बहुमताने मान्यता मिळाली पण खर्चिक बाब पाहता विरोधक तयार झाले. मात्र गणपत विठ्ठल मोहिते म्हणाले तुम्ही सहकार्य केले तर मला खूप काही करता येईल, आणि ते आपल्या कामाला लागले. बघता बघता इमारत तयार झाली. सुरुवातीला विद्यार्थी संख्या कमी असली तरी शिक्षकांचे वेतन देणे क्रमप्राप्त होते. त्यामध्ये सरकारी मानधन नव्हते अशा परिस्थितीमध्ये करावे काय? हा यक्षप्रश्न गणपत विठ्ठल मोहिते यांच्या समोर उभा होता. एक तर आपला प्रपंच सांभाळून शिक्षकांना पगार तसेच लेखन सामग्री याचा खर्च कसा भागवता येईल? पण गणपत विठ्ठल मोहिते यांनी आपली हार मानली नाही. त्यांनी शिक्षकांचे मासिक वेतन स्वतः आपल्या तुटपुंज्या कमाईतून देण्याचे सामर्थ्य दाखवले नाही तर प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले. आज न्यू इंग्लिश स्कूल तळसर हे गणपत विठ्ठल मोहिते यांनी लावलेले रोपटे विशाल वृक्षाच्या रूपाच जग पाहत आहे. प्रत्येक वर्षी इयत्ता दहावीचा निकाल १०० टक्के असतोच पण मार्च २०२० ला घवघवीत यश मिळवणाऱ्या गरीब परिवारातील तीन विद्यार्थिनींनी न्यू इंग्लिश स्कूल तळसर च्या शिरपेचात अभि मानाचा तुरा लावून विद्यालयाला रत्नागिरी जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकावर पोहचवलं.
यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक आयुष्यमान अशोक नलावडे आणि त्यांचे सर्व सहकारी शिक्षक वर्ग त्याचप्रमाणे सर्व कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केले म्हणून त्यांचेही सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. मुक्काम पोस्ट तळसर तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी या समस्त परिवारास न्यू इंग्लिश स्कूल तळसर आणि सर्व विद्यार्थी आणि शिक्षक यांचा सार्थ अभिमान आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here