बिहार पोलिसांच्या दिमतीला सुशांतची बीएमडब्ल्यू, जॅग्वार?

मुंबई (हितेश मिस्त्री) – बिहार पोलिसांची एक तुकडी अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुंबईत दाखल झाली आहे. गेल्या ३ ते ४ दिवसांपासून ते मुंबईत चौकशी करत आहेत. पण, त्यांच्या चौकशीपेक्षा त्यांनी दळणवळणाचे साधन म्हणून वापरलेल्या बीएमडब्ल्यू आणि जॅग्वार कारचीच चर्चा जास्त होत आहे.
बिहार पोलिसांनी गुरुवारी कोटक महिंद्रा बँकेत बांद्रा ब्रँचला भेट दिली. यावेळी ते पांढऱ्या रंगाच्या बीएमडब्ल्यू गाडीतून ब्रँचमध्ये आल्याचे निदर्शनास आहे होते. ज्यावेळी बिहार पोलिसांचा या महागड्या गाडीतून प्रवास करण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि काही वृत्तवाहिन्यांनीही याची दखल घेतली. त्यावेळी त्यांनी ही गाडी मधेच साडून रिक्षाने प्रवास करणे पसंत केले.
त्याच दिवशी संध्याकाळी या पोलिसांच्या तुकडीने सुशांतची पूर्वीची गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेच्या घरी जाण्यासाठी जॅग्वार गाडीचा वापर केला. त्याच्या आदल्या दिवशी बिहार पोलिसांनी मुंबई क्राईम ब्रॅँच ऑफिसला भेट दिली होती. त्यांची वरिष्ठ पोलिसांबरोबची बैठक झाली नाही पण, त्यावेळी त्यांना माध्यमांनी घेरले त्यामुळे ते मोटारसायकलवरुन तेथून निघून गेले.
सुशांत सिंहच्या वडिलांनी रेहा चक्रवर्ती विरोधात पैशाचा गैरव्यवहार केल्याची तक्रार केली आहे. बिहार पोलिस याच तक्रारीच्या आधारे मुंबईत चौकशीसाठी आले होते. रेहा चक्रवर्तीने अनधिकृतरित्या पैसे ट्रान्सफर केल्याचा आणि सुशांतचा मानसिक छळ केल्याचा आरोप सुशांतच्या वडिलांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here