बाधित पोलिसांची धक्कादायक आकडेवारी समोर

मुंबई – संपूर्ण देशात कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोनाचे सर्वाधित रुग्ण महाराष्ट्रात आहे. अशात लॉकडाऊन हळूहळू शिथिल करण्यात येत आहे. परिणामी कोरोनाचा धोका आणखी वाढला आहे.

राज्यात जुलै महिन्याच्या शेवटच्या दिवशी 10320 नवे रुग्ण आढळून आलेत. तर 265 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यात समोर आलेली धक्कादायक माहिती अशी की, राज्यातील पोलिस कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे. गेल्या 24 तासांत 232 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यात आतापर्यंत 9449 पोलिस कर्मचारी कोरोनाबाधित आहेत. त्यात 971 पोलिस अधिकारी तर 8478 पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

सध्या राज्यात 219 पोलिस अधिकारी आणि 1713 पोलिस कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू आहेत. तर, आतापर्यंत 7414 पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे. तर धक्कादायक म्हणजे आतापर्यंत 9 पोलिस अधिकारी आणि 94 पोलिस कर्मचारी मिळून अशा एकूण 103 पोलिसांचा कोरोनानं बळी घेतला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here