टोकियो : ऑलिम्पिक स्पर्धेतील अखेरच्या टप्प्यात भारतीय खेळाडू दमदार कामगिरी करताना दिसत आहे. ५३ किलो वजनी गटात विनेश फोगटने ऑलिम्पिक ब्राँझ मेडलिस्ट सोफियाला पराभूत करत क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केलाय. विनेशने प्रतिस्पर्धा खेळाडूला ७-१अशा फरकाने पराभूत करत पुढची फेरी गाठली.






