अलिबाग-सोगावकर : पाऊस सुरू झाला की वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण अधिक असतो,ते आम्हाला मान्य आहे, पण पाऊस नसतांनाही अथवा वातावरणात कोणताही बदल नसतांनासुध्दा वीजपुरवठा खंडित होण्याचे कारण काय?असा सवाल आता मापगांव ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांसह आम्ही महावितरण अधिकारी वर्गाला विचारण्यासाठी त्यांच्या कार्यालयावर लवकरच धडक देणार आहोत, असे मापगांव तंटामुक्ती अध्यक्ष श्री विवेक जोशी यांनी मापगांव ग्रामस्थांच्यावतीने सांगितले आहे.
पुढे बोलताना सांगितले की, सध्या कोरोना काळ चालू आहे, लोकांचे उद्योगधंदे,व्यापार ठप्प झाली आहेत, लोकांची होती-नव्हती ती नोकरी-रोजंदारी गेली आहे,दिवसदिवस वीजपुरवठा खंडित करून कुठे आहे थोडा-फार धंदा तोसुद्धा बंद करण्यात महावितरण कंपनी हातभार लावत आहे.
फ्रिजमध्ये असलेले घरातील,किराणा दुकानातील दुध, दुगधजन्य पदार्थ, मच्छी,भाजीपाला आदी जीवनावश्यक वस्तू खराब होत आहेत, याला जबाबदार कोण?.हि भरपाई कोण देणार? पावसाळ्यात रात्री लाईट गेली तर गावांमध्ये लाईट नसल्याने जानजानवरांची भीती असते,तर मच्छर चावून इतर आजारांची भीती आहेच,!
लोक कोरोना लॉकडाऊनमध्ये घरात बसून आहेत,त्यामध्ये काही प्रमाणात चुकून १ महिनाच जर लाईटबिल न भरल्यास अधिकारी व कर्मचारी घरांची लाईट कट करायला मागचा पुढचा विचार न करता येतात व लाईट कट करून जातात,आणी तेसुद्धा किती बिल असतो? तर साधारण ७०० रुपये! यांना थोडीतरी माणुसकी आहे का नाही?.
आठवड्यातून तर दोन ते तीन दिवस दिवसभर झाडं तोडणे,अमूक ठिकाणी फॉल्ट आहे, तमुक आहे, इतर अश्या कारणास्तव लाईट बंद करतात, ही काम पावसाळ्यापूर्वी का करत नाहीत? आता पाऊस सुरू झाल्यापासून गेले काही दिवस रात्री-अपरात्री, दिवसांतून चार-चार तास लाईट नसते,कधी-कधी रात्रभर लाईट जातेच आहे,तरीसुद्धा लाईटबिल नेहमीच्या पेक्षा जास्तच येते, वारंवार लाईट नसल्यामुळे ती बिल का कमी येत नाहीत?.
वीजपुरवठा खंडित बाबतीत ग्रामस्थांनी मापगांव ग्रामपंचायतीत सुमारे ५०० नागरिकांचे सह्या असलेले तक्रारअर्ज आलेले आहेत, याबाबत ग्रामपंचायतीने महावितरण कार्यालयाबरोबर पत्रव्यवहार सुद्धा केला आहे, तरीसुद्धा वीजपुरवठा खंडित बाबतीत संबंधित अधिकारीवर्ग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत,असे अनेक प्रश्नांची उत्तरे विचारण्यासाठी लवकरच आम्ही रायगड ओ.बी.सी.सेल अध्यक्ष व मापगाव पंचायत प्रमुख सुनिल थळे व सरपंच श्रीमती उनिता थळे, उपसरपंच वस्सीम कुर, ग्रामपंचायत सदस्य व मापगांव पंचायत हद्दीतील सर्व ग्रामस्थ यांच्या नेतृत्वाखाली सर्व संतप्त ग्रामस्थांसह महावितरण कंपनीच्या कार्यालयावर “न भूतो न भविष्यती” असा मोर्चा काढून जाब विचारणार आहोत, असे संतप्त झालेले जोशी यांनी शेवटी सांगितले आहे.






