दोघी कॉलनीतील रस्ता कॉक्रीटीकरणासंदर्भात मांडली समस्या
जळगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) : दि. ८ ऑगष्ट, २०२१ रविवार रोजी जी.एस. नगर व कृष्णगीता नगर वासियांनी महाराष्ट्र राज्याचे स्वच्छता तथा पाणीपुरवठा मंत्री तसेच आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील साहेब यांची नगरपालिकेत भेट घेतली व कॉलनीतील विविध समस्यांसंदर्भात चर्चा करण्यात आली.
सर्वप्रथम जी.एस.नगर व कृष्णगीता नगर मधील रहिवासी बांधवांनी कॉलनीतील रस्ता कॉंक्रिटीकरण ,पाण्याची पाईपलाईन, व स्ट्रेट लाईट या विविध समस्या नामदार गुलाबराव पाटील साहेब यांच्या समोर मांडल्या. यानंतर नामदार साहेबांनी लगेच प्रशासनाला विचारून जी. एस. नगर व कृष्णगीता नगर या दोघी कॉलनींचे इस्टिमेट तयार आहे व मंजूर झाल्यानंतर दोघी कॉलनीतील रस्ता कॉंक्रिटीकरण करण्यात येईल , तोपर्यंत नगरपालिका प्रशासनाने या रस्त्यांवर तात्पुरती डागडुजी म्हणून मुरूम टाकण्यात यावा, तात्काळ स्ट्रीट लाईट लावण्यात यावे असे आदेश प्रशासनाला दिले.
याप्रसंगी लोकसभा सहसंपर्कप्रमुख गुलाबरावजी वाघ साहेब, लोकनियुक्त नगराध्यक्ष आबासाहेब निलेश चौधरी, शहर प्रमुख राजेंद्र महाजन, पी.एम. पाटील सर, सर्व सन्माननीय नगरसेवक अधिकृत पत्रकार संघटनेचे शहराध्यक्ष लक्ष्मण माळी, बाळासाहेब जाधव, सतीश बोरसे, विनोद रोकडे इ.पत्रकार बांधव तसेच कॉलनीतील जेष्ठ नागरिक गिरधर मोरे, बी.एम.सैंदाणे, प्रल्हाद विसपुते, महेंद्र सैनी, पी.डी.पाटील, राजेंद्र चौधरी, राकेश महाजन, गोकुळ महाजन, अजय मैराळे, बाळू अत्तरदे , जे.एस.पवार, एस.एन. कोळी, अशोक कोळी, सुधाकर मोरे, मनोहर माळी , भिमराव मैराळे, सागर चौधरी, रवींद्र शिरसाठ तसेच जी.एस.नगर व कृष्णगीता नगर मधील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.






