श्रीस्वामीनारायण संस्थान जळगाव येथे साकारणार ५४फुटी हनुमानाचे महापराक्रमी विशाल स्वरूप

श्रीस्वामीनारायण संस्थान जळगाव येथे साकारणार ५४फुटी हनुमानाचे महापराक्रमी विशाल स्वरूप 

जळगाव (क्राइम रिपोर्टर भावेश ठाकूर) : येथील श्रीस्वामीनारायण संस्थान ५४फुटी हनुमानाचे महापराक्रमी विशाल स्वरूप लवकरच ब्लॅक ग्रॅनाईट स्वरूपात साकारले जाणार आहे. या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या पायाभरणीचा व हनुमान देवतेच्या प्रतिकृतीच्या पूजनाचा सोहळा आज श्री स्वामीनारायण संस्थान टीव्ही टॉवर शेजारी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ येथे पार पडला.

याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी महापौर तथा विद्यमान नगरसेवक विष्णूभाऊ भंगाळे यांच्या शुभहस्ते मूर्ती व स्थळ पूजन करून श्रीफळ अर्पण करण्यात आले.

bhumi-poojan

या प्रसंगी प.पु.गोविंद स्वामी, प.पु.पुरूषोत्तम प्रकाश दासजी, प. पु. नयन प्रकाश दासजी शिवसेना महानगरप्रमुख शरदआबा तायडे, माजी स्थायी समिती सभापती/विद्यमान नगरसेवक नितीनभाऊ बरडे, खूबचंदजी साहित्या व राजेश वारके यांचेसह असंख्य भक्तगण यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here