जळगाव (क्राइम रिपोर्टर असलम खान) : शहरातील आर.एल. चौफुलीवर बेकायदेशीररित्य गांजा विक्री करण्याऱ्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली. असुन त्यांच्या ताब्यातील १३ हजार ४५५ रुपये किंमतीचा साडेचार किलो गांजा हस्तगत करण्यात आला आहे.याबाबत एम.आय.डीसी. पुलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर महिती अशी की, जळगाव ते औरंगाबाद रोडवरील आर.एल. चौफुलीवर बेकायदेशीररितीय मंगळवारी ३ ॲगस्ट रोजी सांयकाळी ८ वाजेच्या सुमारास एकजण विक्री करत असल्याची गोपनीय माहिती एम.आय.डीसी. पोलिस ठाण्यांचे निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली. त्याअनुसार संशयित आरोपीवर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना दिल्यात.
पोलिसांनी तात्काळ कारवाई करत गांजाची विक्री करताना संशयित आरोपी बबलू उर्फ टार्जन अरुण देहकर ( वय ३२) रा जाखनीनगर कंजरवाड़ा याला ताब्यात घेतले. त्याची प्रथामिक चौकशी केली असता, त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिली. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून १३ हजार ४५५ रुपये किंमतीचे ४ किलो ४८५ ग्राम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनखाली पोलिस उपनिरीक्षक विशाल सोनवणे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंह पाटिल, पो.ना. इमरान सैयद, हेमंत कळसकर, सुधीर साळवे, पो.कॉ. गोविंदा पाटिल, पो.कॉ. चंद्रकांत पाटील, सचिन पाटील, यांनी केली.






