जळगावतील मासूमवाडी येथे दोन गटात जातीय दंगल; पोलिसांच्या सतर्कतेने अनर्थ टळला

जळगाव (क्राइम रिपोर्टर शाहिद खान) : येथील मासूमवाडी परिसरात दोन गटात जातीय दंगल झाल्याने, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र शहरातील सर्व पोलीस ठाण्यांची यंत्रणा तसेच दंगा नियंत्रण पथक तातडीने घटनास्थळी पोहचल्याने अनर्थ टळला.

घटना घडताच तातडीने वायरलेस संदेश मिळताच सर्व पोलीस ठाण्यांची यंत्रणा तसेच दंगा नियंत्रण पथक हेल्मेट, लाठ्या काठ्या व इतर साहित्य घेऊन घटनास्थळी पोहचले. सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमाच चिंधा जातीने या ठिकाणी थांबून होते. घटना घटताच अवघ्या सहा मिनिटात एमआयडीसी पुलिस ठाण्यांचे गुन्हे शोध पथकाने सहाय्यक फौजदार, अतुल वंजारी, गोविंदा पाटिल, हेमंत कळसकर, मुदस्सर काझी, इमरान सैयद, चंद्रकांत पाटील,व सुधीर साळवे दाखल झाले.

त्यानंतर दहाव्या मिनिटाला शनिपेठचे निरीक्षक विठ्ठल ससेही दुचाकीने पोहचले तर बाराव्या मिनटात निर्भया पथक दाखल झाले. हळूहळू २५ मिनटात शहरातील सर्व प्रभारी अधिकारी बीट मार्शल गुन्हे शोध पथक व दंगा नियंत्रण पथक दाखल झाले. तिथे जमल्यावर कुमार चिंथा यांनी; सर्वाना अनुचित प्रकार असो किंव एखादी घटना अशाच पद्धतीने तातडीने पोलिसांनी घटनास्थळी पोहचणे आवश्यक असल्यानचे सांगून सर्वांचे कौतुक करीत विलंब झाले त्यांनी कडक शब्दात तंबी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here