पनवेल शिवसेनेतर्फे वृक्षारोपण

पनवेल (ॲड.विष्णू गवळी) – गुरुवार (दि.३०) आग्रोळी स्मशान भूमीजवळील परिसरामध्ये शिवसेना उपजिल्हा प्रमुख रोहिदास पाटील यांच्या हस्ते व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षा रोपण करण्यात आले. अनेक प्रकारची फुलझाडे तसेच फळझाडे लावण्यात आली.स्मशान भूमी ते पारसिक हिल व पारसिक हिल ते अपोलो हॉस्पिटल पर्यंत रस्त्याच्या कडेला झाडे लावण्यात आली. याप्रसंगी पारसिक हिल रेसी.ऑनर्स असो.चे अध्यक्ष. जयंत ठाकूर Calibar कंपनीचे चेअरमन नारायण भार्गव, दिवांशिन हॉटेलचे ओनर शेखर दर्जी, सागर दर्जी, शाहनवाज समशी, किशोर मुखी, ओनील शहा, उद्यान अधिकारी सौ.पूनम चासकर, दीपक पाटील, रोशन पाटील,व नागेश चव्हाण उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here