धरणगाव तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे तालुक्यातील कोराना योद्धांचा गौंरव

जळगांव (निलेश पाटील) – उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त माजी मंत्री आप्पासाहेब गुलाबरावजी देवकर यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील यांच्या संकल्पनेतून विविध क्षेत्रातील कोराना योद्धांचा प्रशीस्तपत्र देऊन सन्मानित करण्यात आले दिं 29 रोजी तहसील कार्यालय येथे नायब तहसीलदार प्रथमेश मोहोळ , पुरवठा अधिकारी नंदकिशोर वाघ, व सर्व कर्मचारी, तालुका पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक पवन देसले, पोलिस उपनिरीक्षक अमोल गुंजाळ, स.पोलिस निरीक्षक गणेश अहिरे, पाळधी पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक हणुमंत गायकवाड, तालुका ग्रामिण रुग्णालयात डॉ गिरीश चौधरी, मेडीकल ऑफिसर डॉ बारेला , नामदेव मराठे , प्रविण चव्हाण , डॉ कुमढ यासह सर्व कर्मचारी स्वत धान्य दुकान तालुकाध्यक्ष रमेश धुडकु पाटील, शहरध्यक्ष निलेश शांतिलाल ओस्तवाल तसेच तालुक्यातील पत्रकार , डॉक्टर, नर्स ,आशा वर्कर या सर्व कोराना योद्धांचा प्रशीस्तपत्र देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी तालुकाध्यक्ष धनराज माळी, जिल्हा उपाध्यक्ष दिपक वाघमारे, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, माजी जि .प सदस्य रविंद्र दादा पाटील, युवक तालुकाध्यक्ष नाटेश्वर पवार, सिताराम मराठे , जगदिश जगताप, राहुल पाटील, यांच्या हस्ते प्रशिस्तपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here