सार्वजनिक रस्त्यावरील लाँरी धारकांचा दुकानदारांसह सर्वसामान्य नागरिकांनाही त्रास…

  • अनधिकृत रोडावर उभ्या केल्या गेलेल्या लाँऱ्या-टपऱ्यामुळे गाव झाले भकास…
  • नगरपालीकेची.दहा-वीसची डेली पावतीच,खरे अनधिकृत लाँऱ्या उभे राहण्याचे कारण…

दोंडाईचा (प्रतिनिधी) : शहरातील दळणवळण व उद्योग धंद्याचा श्वास म्हणून ओळखला जाणारा महत्वाचा रस्ता म्हणजे स्टेशन भाग व त्यावरील सतरा कोटी रुपये खर्चून सात वर्षांपासून बांधकाम सुरु असलेला राजपथ रस्ता होय. मात्र ह्या रस्त्यावर मोकळा श्वास घेण्याच्या बाबतीत सुरूवातीपासुनच शनी लागलेला आहे. म्हणून राज्यात रहदारीस अडथळा ठरणाऱ्या बसस्टँड जवळील इतर महानगरपालिका-नगरपालिका येथील अतिक्रमण-अनधिकृत पत्र्यांचे शेड,टपऱ्या, लाँऱ्या ताबडतोब निघाल्या. मात्र दोंडाईचा शहरात अनेक वर्षाच्या न्यायालयीन कसरतीनंतर १८ जानेवारी २०१२ रोजी स्टेशन भागातील व आताच्या नवीन नाव देण्यात येणाऱ्या राजपथ रस्त्यावरील जवळपास तीनशे ते साडे तीनशे दुकानदांराचे अतिक्रमीत दुकना,पत्र्यांचे शेड, टपऱ्या,लाँऱ्या काढण्यात आल्या. तेव्हा संबधित अतिक्रमनधारकांनी बराच कायदेशीर कागदपत्रे पुढे आणत उहापोह केला.मात्र शासनाने नगरपालिका,पोलीस, महसुल आदींच्या साहाय्याने बेकायदेशीर दुकाना, पत्र्याचे शेड, टपऱ्या, लाँऱ्या काढल्याच व आता कुठे जाऊन हा राजपथ नावाचा शंभर-एकशे वीस फुट मोठा मोकळा रोड डोळ्यांना दिसत आहे.

आजही ह्या रस्त्यावर नगरपालीकेच्या अकार्यक्षम, दुर्लक्षपणामुळे जैसे-थै परिस्थिती होऊ पाहत आहे. त्याला कारण म्हणजे हे बेकायदेशीर लाँऱ्या धारक सहज नगरपालीकेची दहा-वीस रूपयांची पावती फाडून कोणत्याही कायदेशीर दुकानापुढे सार्वजनिक रहदारीच्या रस्त्यावर माय पावरमध्ये लाँऱ्या लावत आहे. म्हणजे ह्या रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्या सर्वसामान्य नागरिकालाही अडचण व ग्राहक बनून जरी नागरिक आले तरी त्यांना संबधित दुकानांपुढे वस्तु घेण्यासाठी वाहन लावता येत नसल्याचा रोजचा तगादा. त्यामुळे दुकानदार व लाँऱ्या वाल्यांमध्ये नियमित भानगढ पाहायला मिळते किंवा वाहनधारक व लाँरी वाल्यांमध्ये अनेकवेळा भानगढ पाहायला मिळते.त्यासाठी अनेक ग्राहक कोणाशी भानगढ नको म्हणून माज रस्त्यात वाहन उभे करायला तयार होतात व बिनधास्त वस्तु खरेदी करायला वेळ लावतात.म्हणून फक्त दहा-वीसची नगरपालीकेची पावती फाडत.

लाँरी धारकामुंळे ह्या शहराच्या महत्त्वाचा उद्योग धंदे,दळणवळणाचा श्वास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर गर्दी, ट्रँफीक जाम, श्वास गुदमरत असेल. तर अशा बेकायदेशीर लाँऱ्या मुख्याधिकारी यांनी आपले कर्तव्य समजत.हया अनधिकृत रहदारीस अडथळा ठरणाऱ्या लाँऱ्या ताबडतोब काढत.त्यांना इतरत्र व्यवसाय करण्यासाठी हक्काची जागा वार्षिक कराराने उपलब्ध करून द्यायला पाहिजे आणि सर्व लाँरी धारकांचेही हीच मागणी आहे की,आम्हाला व्यवसाय करण्यासाठी हक्काची जागा उपलब्ध करून द्यावी. रोज उठून सरकारी कार्यवाही व दंड भरायला कोणी तयार नाही. जर करोडो रूपये खर्चून सरकार शहराचा विकासात भर घालणारे सुशोभित रस्ते बनवत असेल तर मुख्याधिकारी यांनी सक्षम होत.कोणत्याही पाँलीटिकल आँडर,निर्णयाची वाट न बघता.जनताभिमुख निर्णय घ्यायला काय हरकत आहे. शेवटी जनतेची योग्य कामे करण्यासाठी सरकारने त्यांना ह्या खुर्चीवर बसविले आहे. म्हणजे एखाद्या विषयांचा,समस्येचा स्फोट होईल. तेव्हाच त्याच्यावर मार्ग काढला जाईल हे योग्य नाही.

स्थानिक पोलीस प्रशासन मागील तीन आठवड्यापासुन सार्वजनिक रहदारीस अडथळा ठरणाऱ्या लाँऱ्या धारकांना हटकत होते व वेळप्रसंगी न ऐकल्यामुळे दंडाची कार्यवाही करत होते. म्हणून हाच पुढाकार वेळे अगोदर आपण घेतला असता.तर कालची तापलेली परिस्थिती निर्माण झाली नसती.म्हणून सरकार प्रत्येक गाव-शहर सुंदर-सुशोभित दिसण्यासाठी करोडो रूपये खर्च करते.पण आपले योग्य वेळी योग्य निर्णय न घेतल्यामुळे शहरातील करोडो रूपयांचा रस्त्यांचा विकास होण्याऐवजी भकास होऊ शकतात. म्हणून आपण वेळीच मोठी क्लेशदायक घटना होण्या अगोदर लाँरी धारकांना हक्काची वार्षीक भाडेतत्त्वावर जागा उपलब्ध करायला हवी, अशी अंर्तहाक लाँऱ्या धारकांच्या तापलेल्या परिस्थितीवर जनमाणसातुन निघत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here