धरणगांव येथे साहित्य कलामंच च्या वतीने“बालकवींच्या” जयंतीनिमित्त उद्या विवीध कार्यक्रमाचे आयोजन..

जळगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) : अवघ्या महाराष्ट्राच्या मनावर आपल्या निसर्ग कवितांनी एका शतकाहून अधिराज्य गाजविणारे “बालकवी” यांचा जन्म १३ ऑगस्ट १८९० रोजी धरणगावच्या पावन भूमीत झाला असून तिचा लौकिक सातासमुद्रापार नेणारे तुम्हा – आम्हा सर्वांचे, धरणगावचे भूषण, मराठी कवितेचा मानबिंदू स्व.बालकवी अर्थात स्व.त्र्यंबक बापूजी ठोमरे यांची उद्या

१३ ऑगस्ट २०२१ शुक्रवार रोजी सकाळी १० वाजता नियोजित बालकवी स्मारक, चोपडा रोड येथे १३१ वी जयंती साजरी करण्यात येणार आहे. यानिमित्ताने स्व. बालकवींच्या प्रतिमेचे पूजन समन्वय समितीचे अध्यक्ष गुलाबराव वाघ यांच्या हस्ते तर, धनपा लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांच्या हस्ते औदुंबर वृक्षाचे रोपण करणार आहेत.

balkavi-jayanti

कार्यक्रमाचे अध्यक्ष डी. जी. पाटील साहेब, भूषविणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून सर्वश्री. सिनेट सदस्य प्रा.डी.आर.पाटील, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, माजी उपनगराध्यक्ष दिपक वाघमारे, ओबीसी जिल्हाध्यक्ष संजय महाजन हे उपस्थित राहणार आहेत. तरी धरणगांव साहित्य कला मंचच्या वतीने अभिवादनपर हृदय कार्यक्रमाला उपस्थिती द्यावी. असे साहित्य कला मंचचे अध्यक्ष – प्रा.बी.एन.चौधरी, उपाध्यक्ष – डी.एस.पाटील, सचिव – डॉ.संजीवकुमार सोनवणे, सदस्य – प्रभाकर नेरपगार, वं.दे.लोहार, बी.डी.शिरसाठ, आर.के.सपकाळे, कैलास पवार, वासुदेव पाठक यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here