अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूलमध्ये जागतिक ग्रंथपाल दिवस साजरा

पुणे (उपसंपादक वासंती देवळे) : महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूल येथे ‘जागतिक ग्रंथपाल दिवस व डॉ. एस. आर. रंगनाथन जयंती निमित्त ऑनलाईन प्रश्नमंजुषा या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले.

या प्रश्नमंजुषेत प्रशालेतील २५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सर्व सहभागी स्पर्धकांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती परवीन शेख यांनी ऑनलाईन ग्रंथालयाचे महत्त्व याबद्दल मार्गदर्शन केले. अमन सुल्तान मुल्ला या विद्यार्थ्यांने एस आर रंगनाथन यांच्या जीवनावर व्याख्यान दिले.

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रशालेतील ग्रंथपाल सौ. अस्मा शेख यांनी प्रयत्न केले . शिक्षक आणि विद्यार्थी सहभागी झाले. या निमित्ताने संस्थेचे अध्यक्ष डॉ.पी. ए. इनामदार व प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती परवीन शेख यांनी सहभागी स्पर्धकांचे अभिनंदन केले.आज दिनांक १२ ऑगस्ट २०२१ रोजी आझम कॅपम्स मध्ये हा कार्यक्रम झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here