राजपूताना रायफल्सकडून गोल्डन बॉय नीरजचे जंगी स्वागत; पाहा व्हिडियो

नवी दिल्ली : भालाफेकमध्ये टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरज चोप्राचे राजपुताना रायफल्सकडून जंगी स्वागत करण्यात आले. त्याआधी नीरजने चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत आणि लष्कर प्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांची भेट घेतली. नीरज २०१६ साली भारतीय लष्करात दाखल झाला होता. तो राजपुताना रायफल्समध्ये सुभेदार या पदावर आहे.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर भारतीय लष्कराने सोशल मीडियावरून त्याचे अभिनंदन केले होते. रावत आणि नरवणे यांची भेट घेतल्यानंतर नीरजचे त्याच्या राजपुताना रायफल्सने जंगी स्वागत केले. राजपुताना सेंटरमध्ये नीरजला गेटवरून एका खुल्या जीपमधून मुख्य इमारतीपर्यंत नेण्यात आले. जीपला फुलांनी सजवण्यात आले होते. यावेळी ‘सारे जहाँ से अच्छा हिन्दोस्तां हमारा’ हे गाणं लावण्यात आले होते.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवल्यानंतर नीरजला जागतिक क्रमवारीत देखील फायदा झाला. नीरज १६व्या क्रमांकावरून दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याच्या पुढे जर्मनीचा जर्मनीचा जोहानस वेटर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here