विश्ववेध राज्य पत्रकार संघटनेच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी शिवानंदन उपे यांची निवड

जळगाव (क्राइम रिपोर्टर अल्ताफ शेख) : विश्ववेध राज्य पत्रकार संघटनेच्या नांदेड जिल्हा जिल्हाध्यक्ष पदी शिवानंदन उपे यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. ही निवड राज्याध्यक्ष शैलेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. विश्ववेध राज्य पत्रकार संघटनेची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीत नांदेड येथील शिवानंद उपे यांनी पत्रकारिता क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत, राज्याध्यक्ष शैलेश पाटील यांच्या हस्ते शिवानंदन उपे यांची नांदेड जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली.

यावेळी राज्य कार्याध्यक्ष अशोराज तायडे राज्य सचिव राजेंद्र शर्मा, राज्य उपाध्यक्ष जगदिश गाढे, राज्य सल्लागार युवराज वाघ, जळगाव जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी शिवानंदन उपे यांचे अभिनंदन करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here