शंभरीत पदार्पण केल्यानिमित्त शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा उद्या नागरी सत्कार

पुणे (उपसंपादक वासंती देवळे) : छत्रपती शिवरायांचा दैदीप्यमान इतिहास सर्वसामान्यांपर्यंत पोहचविणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे शंभराव्या वर्षात पदार्पण करत असल्याच्या निमित्ताने त्यांचा नागरी सत्कार सोहळा आयोजित केला आहे. उद्या, शुक्रवारी पुण्यातील आंबेगाव येथील शिवसृष्टीतील सरकारवाड्यात सकाळी ११ वाजता हा सोहळा पार पडणार आहे.

या कार्यक्रमात उपस्थितांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमात ऑनलाईन संवाद साधणार आहेत. बाबासाहेबांनी ध्यास घेतलेला ‘शिवसृष्टी’ प्रकल्प साकारण्याचा संकल्प या निमित्तानं करण्यात येणार आहे.शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे सत्कार समारोह समितीच्या अध्यक्षा व लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

कोविड मर्यादांचे पालन करीत मोजक्या नामवंतांच्या उपस्थितीत होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमात व्हर्च्युअल सहभाग असेल. सुमित्रा महाजन, छत्रपती शिवेंद्रराजे भोसले आणि महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात येईल. सत्कार समारोह समितीचे सदस्य खासदार विनय सहस्रबुद्धे या गौरव समारंभात सहभागी असतील, अशी माहिती जगदीश कदम यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here