लेखक: सुभाष शांताराम जैन
मुलांनो आज आपण देशप्रेम या विषयावर चर्चा व गप्पा मारू या आवडेल ना तुम्हाला? सुरक्षित अंतर ठेवून बसा. आपल्या व सर्वांच्या सुरक्षिततेसाठी आधी सर्वांनी मास्क लावलेले आहे ना? सर्व सुरक्षित अंतर ठेवून बसा.ठिक .भारत माझा देश आहे प्रतिज्ञा म्हणा भारत माझा देश आहे.
आज आपण हीच प्रार्थना जरा वेगळ्या स्वरूपात म्हणू या. सध्या अजूनही कोरोना चा प्रादुर्भाव ओसरलेला नाही आधी मी म्हणेन मग माझ्या पाठीमागे तुम्ही म्हणा.ओके.
भारत माझा देश आहे .सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशातील पोलिसांचा, डॉक्टरांचा,आणि धोरणाशी लढणाऱ्या प्रत्येकाचा मला अभिमान आहे. स्वच्छता राखून अंतर ठेवून कोरोना मुक्त देश करण्याची भावना माझ्या अंगी रहावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. मी स्वतः घरातच राहून पालकांची योजनांची आणि देशातील प्रत्येक नागरिकांची काळजी घेईन. आणि देशातून कोरोना पळवून लावीन. प्रशासनाच्या प्रत्येक सूचनांचे पालन करून एकात्मता दाखविण्याची ही प्रतिज्ञा करत आहे .आरोग्यसंपन्न नागरिक आणि कोरोना मुक्त देश यातच माझे सौख्य सामावलेले आहे.
सर्व लहान मुले आजोबांच्या नंतर एका सुरात म्हणतात. मी प्रश्न विचारतो .तुम्ही उत्तर द्यायचे.ज्याला उत्तर येत असेल त्याने हात वर करायचा. गोंधळ करायचा नाही. मी मी आजोबा आणि मी आजोबा म्हणायचे नाही .आजोबांकडे मोठ्या हॉलमध्ये प्रियांका, अस्मि ,विभूती , जीनेशा, राजश्री ,राजू, किरण, विजू, संजय ,मनोज ,अमोल ,समीर , आशुतोष इत्यादी मुले जमली होती.
आजोबा: आपला गणतंत्र दिवस कोणता आहे?
राजू: आपला गणतंत्र दिवस 15 ऑगस्ट आहे.
आजोबा: आपल्याला स्वातंत्र्य कधी मिळाले?
आशुतोष: आजोबा 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळाले.
आजोबा : आपली प्रजासत्ताक दिन तारीख काय?
अस्मी: प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी.
आजोबा आपल्या लहानपणीच्या आठवणी सांगतात. आम्ही लहान असताना आम्हाला 15 ऑगस्ट ला खाऊ वाटायचे. पाहुणे येऊन भाषण सांगायचे. तिरंगी झेंड्या बद्दल माहिती द्यायचे. आम्हाला खूप आनंद व्हायचा. पेढे वाटायचे. तिरंगी ध्वज झेंड्या बद्दल आपण अभिमान बाळगला पाहिजे. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. घरदार सोडले. तन-मन-धन अर्पून स्वातंत्र्य मिळविण्यासाठी कष्ट केले.15 ऑगस्ट 26 जानेवारी आपले राष्ट्रीय सण आहेत. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला रेडिओवर टीव्हीवर देश भक्ती ची गाणी लावली जातात.आपण ऐकतो. फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला देशभक्तीपर गीत ऐकतो. नंतर आपला राष्ट्रीय सण विसरून जातो.
तरुण मुलांनी सैनिकात भरती व्हायला पाहिजे. मोठं झाल्यावर काय होईल विचारले तर मुलं सांगतात कुणी म्हणतात मला इंजिनिअर व्हायचंय मी डॉक्टर होईल सांगतो. सैनिकात भरती होईल असे फारच कमी सांगतात.
आजोबा :आपल्या राष्ट्रध्वजात किती रंग आहेत ?
अन्मय: आजोबा केशरी ,पांढरा, हिरवा .
आजोबा :बरोबर .
आजोबा:बरं तर सांगा तिरंगा राष्ट्रध्वजात निळ्या रंगाच्या चक्रात आरे किती असतात? विभूती बाबा बाबा आजोबा 24आरे असतात .
माहितीआहे का तुम्हाला आपल्या देशात सम्राट अशोक राजा होऊन गेला.अशोक चक्र तिरंगी झेंड्याच्या मधल्या सफेद पट्यावर असते.
आजोबा :आपल्या देशात 15 ऑगस्ट 26 जानेवारी ला शाळा कॉलेजला सुट्टी असते .पण शाळेत विद्यार्थ्यांना बोलवून झेंडावंदन करतात .
आजोबा:आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान त्यांचे नाव सांगू शकेल मला कोणी ?
आजोबा: माननीय श्री. नरेंद्र मोदीजी साहेब. आजोबा बरोबर.आताची मुलं मोबाईल मुळे खूप हुशार झालीत. आता तर मोबाईल मुळे खूप खूप हुशार झाली आहेत .पण मुलांनो मोबाईल मोबाईल जास्त वेळ बघत बसू नका .डोळे खराब होतात चष्मा लागेल.मुला़ंनो आता तर शाळा बंद असल्याने मोबाईल वरच शिक्षण घेत आहात.तुम्ही मुलांनो.
मला सांगा म्हणून दाखवा एखादं देशभक्तीपर गित .आजोबा आम्ही म्हणतो . अस्मि ,समृद्धी,सुमेर, विभुती,जीनेशा सुरू करा . सर्व एकत्र एका सुरात म्हणतात .विजयी विश्व तिरंगा प्यारा झंडा उंचा रहे हमारा ……..
आजोबा: राष्ट्रध्वज आंध्रप्रदेशचे पिंगली व्यंकय्या यांनी बनविला .आपल्या राष्ट्राला देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी अनेक देशभक्तांनी घरदार सोडून प्राणांचे बलिदान दिले तेव्हा कुठे स्वातंत्र्य मिळाले. मंगल पांडे, महात्मा गांधी ,सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक ,स्वातंत्र्यवीर सावरकर ,बाबू गेनू ,सरदार वल्लभाई पटेल ,किती नावे सांगू तुम्हाला? पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लालबहादूर शास्त्री ,डॉक्टर राजेंद्र प्रसाद, जयप्रकाश नारायण, मोरारजी देसाई, इंदिरा गांधी इ. देशभक्तांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले तन, मन ,धन अर्पण केले. स्वातंत्र्यवीरांना देशभक्तांनो सलाम नमस्कार आपल्या देशभक्तीला.सर्वांची नावे सांगितले तर वेळ पुरणार नाही क्षमस्व .
आजोबा:तिरंगा बनवण्यासाठी कोणते कापड वापरतात ?
समीर : कॉटन कपडा वापरतात. आजोबा सांगतात राष्ट्रध्वजाच्या आकार आयताकृती तीन बाय दोन फूट असावा .झेंड्यावर काही लिहू नये. सजावटीसाठी वापरू नये ,झेंड्याचा अपमान होऊ देऊ नये .झेंडा जमिनीवर पडू देऊ नये .प्लास्टिकचा नसावा. सर्व शाळा महाविद्यालयात 15ऑगस्ट 26 जानेवारी झेंडा वंदन कार्यक्रम असतो .झेंडा वंदन करण्यासाठी त्यांना बोलवून घेतात.पाहुण्यांच्या हस्ते झेंडावंदन करतात.
आजोबा: राष्ट्रपतींचे नाव माननीय श्री. रामनाथजी कोविद आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आहेत.
शाळेत मुले शिक्षक तिरंगी झेंडा लोगो आपल्या कपड्यावर लावतात. कार्यक्रम ठेवतात . सर्वत्र उत्साहाचे वातावरण असते. मुलांनो राष्ट्रध्वज नीट सांभाळा. जमिनीवर पडून पडू देऊ नका .कोणी राष्ट्रध्वज जमिनीवर पडल्यास उचलून घ्यायला सांगा .मुलांनो तुम्ही मोठी झाल्यावर देश सेवा करणार ना? सगळी मुले हो आजोबा. आपल्या आई वडिलांना दुखऊ नका. त्यांचा मान राखा .चला सगळे सगळे म्हणा जय हिंद .या सगळ्यांनी चॉकलेट घ्या हातावर . चला . आता चर्चा, गप्पा संपली. काळजी घ्या.घरातून बाहेर जातांना मास्क चा वापर नक्की करा.हात साबणाने स्वच्छ धुत जा. सुरक्षित अंतर ठेवत जा. अनावश्यक कामासाठी बाहेर पडू नका.
. सुखाने जगा, दुसऱ्यांनाही सुखाने जगू द्या.
©®स्वलिखित:लेखक :सुभाष शांताराम जैन, ठाणे. पत्रकार,कवी,लेखक,छायाचित्रकार,समाजसेवक,ठाणे . साईनाथ सोसायटी, वर्तक नगर, ठाणे. व्हाट्सअप 8779348256/ मो.982182885, [email protected]






