श्रीराम प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन साजरा

जळगाव (क्राइम रिपोर्टर भावेश ठाकूर) : श्रीराम प्राथमिक व माध्यमिक विद्यालय 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे उपाध्यक्ष श्री बाळाजी सानप सर होते तर प्रमुख अतिथी संस्थेचे संचालक गजानन लाडवंजारी होते , संस्थेचे अध्यक्ष पन्नालाल वंजारी संस्थेचे सचिव अशोक लाडवंजारी, संचालक वासुदेव सानप ,श्री सुरेश लाड श्री देविदास आंधळे, श्री संतोष चाटे, संध्याताई नाईक, शुभम लाडवंजारी ,डॉक्टर तुषार मोरे ,प्रकाश बडगुजर हे होते. कार्यक्रमाची सुरुवात अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांनी भारत माता व प्रभु रामचंद्राच्या पूजनाने केली. संस्थेचे संचालक श्री गजानन लाडवंजारी यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले

कार्यक्रमाप्रसंगी इयत्ता दहावीतील विद्यार्थिनी अंकिता इंगळे हिला मराठी विषयात 90 पेक्षा अधिक गुण मिळाल्याबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक दिवाकर जोशी सरांनी 1001 शिष्यवृत्ती दिली. तसेच इंग्रजी विषयांमध्ये 90 पेक्षा अधिक गुण मिळाल्याबद्दल विद्यालय शिक्षिका प्रतिभा पाटील मॅडम यांनी 1001 शिष्यवृत्ती दिली. तसेच रोटरी क्लब तर्फे 55 इंची टीव्ही LED मिळाल्याबद्दल शिक्षिका प्रतिभा पाटील मॅडम,व दिनेश पाटील सर यांचा सत्कार संस्थेतर्फे करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष श्री पन्नालाल वंजारी व कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळाजी सानप सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले shreeram-highschool-jalgaon

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतुल चाटे सर यांनी केले तर कार्यक्रमाचे नियोजन सरस्वती पाटील मॅडम यांनी केले. आभार प्रदर्शन संनो पिंजारी मॅडम यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले व सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here