लहान मुलांना खाऊ आणि मास्क, सँनिटाइजरचे वाटप
ठाणे (सुभाष शांताराम जैन) : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य अध्यक्ष वसंत मुंढे, राज्य संघटक संजय भोकरे, मुबंई विभाग प्रमुख रणधीर कांबळे, प्रदेश उपाध्यक्ष राकेश टोळ्ये, राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे, प्रसिध्दी प्रमुख नवनाथ जाधव कोकण विभागीय अध्यक्ष नितीनजी शिंदे,कोकण विभागीय सचिव किशोरजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण विभाग व ठाणे शहर यांच्या वतीने ७५ व्या स्वातंत्र्य दिन अमृतमहोत्सव साजरा करण्यात आला.
कार्यकारणी तसेच सर्व सदस्य यांनी भारतमाता, महात्मा गांधी , डाँ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी ठाण्यातील तीनहात नाका येथील सिग्नल शाळेतील मुलांना, माजीवडा तसेच स्टेशन येथील गरजु व गरीब मुलांना खाऊ आणि आवश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले.
यावेळी कोकण विभाग व ठाणे शहर अध्यक्ष नितिन मनोहर शिंदे, ठाणे शहर सचिव मिलींद दाभोळकर, संर्पक प्रमुख सतिशकुमार भावे, कार्याध्यक्ष अतुल तिवारी, सह सचिव ज्योती चिंदरकर, सह सचिव प्रमोद घोलप, सहसंपर्क प्रमुख मनिष वाघ, संघटक मनोज कदम, कल्याण संघटक मिनल मोरे,प्रसिध्दीप्रमुख सुबोध कांबळे, देवेंद्र शिंदे, अमित गुजर, सदस्य राहुल आहिरे, सचिन शिंगे, अमित जाधव, न्युज मराठी बाणा आणि सा. तरुण आव्हान प्रतिनिधी मनीष तळदेवकर, मनस्वी चौधरी, पल्लवी होनखंडे, वंशिका चाचे मनाली मोरे, समाधान अवताडे, संजोग अधिकारी उपस्थित होते.






