नेवासा (प्रतिनिधी) : सोनई पोलिस स्टेशन व शनि शिंगणापूर पोलिस स्टेशन हद्दीमध्ये शुभमभाऊ बंब यांच्या संकल्पनेतुन महिला व मुलीच्या सुरक्षेसाठी हेल्पलाईन सुरू करावी ह्या साठी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या वतीने मा. पोलिस निरीक्षक साहेब यांना आज निवेदन दिले.
यावेळी आम्ही महिला आणि मुलींच्या सुरक्षेसाठी तत्पर आहोत असे मा. पोलिस निरीक्षक साहेबांनी सांगितले.यावेळी बोलताना कार्याध्यक्ष अभिराज आरगडे पाटील म्हणाले की महिला आणि मुलींच्या सुरक्षेसाठी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस सह तालुकाध्यक्ष सागर महापूर यांच्या नेतृत्वाखाली नेहमी सतर्क राहू,
यावेळी तालुकाध्यक्ष सागरभाऊ महापूर, तालुका उपाध्यक्ष अमानभाई सय्यद, तालुका कार्याध्यक्ष अभिराज आरगडे, सरचिटणीस सौरभ वायकर, चिटणीस सोहेल सय्यद, क्रुष्णा कडेल, उपाध्यक्ष शुभम गव्हाणे, मालक ग्रूप अध्यक्ष सत्यम यादव, सरचिटणीस विराज देशमुख, राजेश यादव, रुषि वायकर, नरेंद्र महापूर आदी उपस्थित होते.





