बाजार सावंगी पोलिसांमुळे जुगार अड्ड्यांना ऊत; हप्त्याकाठी मिळतात लाखो रूपये

बाजार सावंगी (प्रतिनिधी मूनीर शाह) : बाजार सावंगी पोलिसांच्या खाकी च्या आशीर्वादाने जुगाराचे अड्डे रंगू लागले आहेत पोलिसांच्या देखत असे प्रकार सुरू आहेत त्यांच्याकडून मात्र तेरी भी चूप मेरी भी चुप अशी भूमिका घेतली जात आहे एकंदरीत खुलेआम सुरू असलेल्या या प्रकाराने पोलिसांच्या भूमिकेबाबत शंका उपस्थित केली जात आहे.

जुगार यांचे मोठे रॅकेट तयार झाले असून पोलिस प्रशासन याकडे अर्थपूर्ण कानाडोळा करत आहेत बाजार सावंगीत परिसरातील जूगारी येऊन मोठी आर्थिक उलाढाल करत आहेत यात रात्रीत मोठी आर्थिक उलाढाल व्हायची मात्र अलीकडील काही वर्षांत जुगारीवर.बंदी आली जुगाऱ्यांनी नवी शक्कल लढवत पोलिसांना हाताशी धरून आर्थिक व्यवहार देवाण घेवाण करत बऱ्याच ठिकाणी.जुगार अड्डे यांनी डोके वर काढले आहेत सुरुवातीला डोंगर कपारीत असलेल्या गावात गणेश उत्सवा वेळी असे जुगार चालायचे मात्र आता अगदी बाजार सावंगी पोलिसां समोर बाजार सावंगी.कन्नड जैतखेडा या रोडवर खुलेआम जुगार सुरू आहेत असा सवाल जनतेतून होत आहे.

काही वर्षापूर्वी पोलीस अधीक्षक अमितेश कुमार यांनी अवैध धंद्यांना आळा घातला होता त्यांनी धडक मोहीम राबविण्यात असे धंदे बंद पाडले होते त्यामुळे अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले होते मात्र सध्या स्थिती पाहता अवैध धंद्यांना ऊत आला आहे त्यामुळे आता पोलीस अधीक्षक(S.P) मोक्षदा पाटील तरी याला आळा घालतील का असा प्रश्न नागरिकांसमोर उभा राहिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here