न.पा.चे व्यापारी गाळे खाली,चौका-चौकात लाँऱ्या हातगाड्या कोणाच्या आशिर्वादामुळे…

  • नगरपालिका प्रशासन व राजकीय मंडळी भाजीपाला लाँरी धारकांचा प्रश्न मार्गी लावण्यास उदासीन का….
  • उत्पन्न वाढीसोबत,सोयी सुविधा देणे नगरपालीकेचे काम…

दोंडाईचा (प्रतिनिधी) : येथील नगरपालिका प्रशासना व तत्कालीन सत्ताधारी गटाने मागील पंधरा वर्षापुर्वी गावात लोकसंख्या व बेरोजगार तरूणांची वाढती संख्या पाहता.गावातील प्रमुख रस्ते व जागा उपलब्ध असलेल्या ठिकाणी तरूणांना व्यापार-व्यवसाय करून रोजगार निर्मितीसाठी व्यापारी गाळे बांधले होते. त्यापैकी थोडेफार सोडले तर अनेक व्यापारी गाळे वेगवेगळ्या कारणासाठी खाली पडून आहेत. त्यामुळे सहाजिकच नगरपालीकेचे दरवार्षिक उत्पन्न बुडत आहे.

याऊलट दुसरीकडे गावाची परिस्थिती पाहिली. तर राजपथसारख्या मुख्य रहदारीच्या रस्त्यासह गावातील चौका-चौकात, गल्लीबोळात लाँऱ्या, टपऱ्या, चार चाकी वाहनांवर सुरू झालेल्या दुकानांनी रहदारीस अडथळा निर्माण करुन गावाची विकासाची दिशा भकास करून ठेवली. गावात रहदारीच्या रस्त्यावर ह्या लाँऱ्या, टपऱ्या कोणाच्या आशीर्वादाने ठेवल्या जातात. हे जगजाहीर आहे. मात्र हे अनधिकृत लाँऱ्या, टपऱ्या धारक यांना भाजीपाला व्यापार-व्यवसाय करण्यासाठी हक्काची जागा मिळवण्यासाठी कोणीही पुढारी, प्रशासन पुढाकार घेताना दिसत नाही आहे. तसेच नगरपालिका प्रशासन ही पालीकेचे उत्पन्न वाढीसाठी कुठेलेही ठोस प्रयत्न करताना दिसत नाही आहे. म्हणून नगरपालिकेने आहे त्या व्यापारी गाळ्यांना सोयीसुविधा उपलब्ध करत व भाजीपाला लाँऱ्या धारकांना कायमस्वरूपी हक्काची जागा उपलब्ध करत.त्यामुळे निश्चितच नगरपालिका उत्पन्नात वाढ होत. शहर स्वच्छ व सुंदर दिसायला लागेल.तुर्तास गावासाठी ऐवढे तरी प्रयत्न न.पा.प्रशासनाने करायला हवे,अशी जनमानसात भावना निर्माण होत आहे.

आज दोंडाईचा शहरातील प्रमुख म्हटला जाणारा राजपथ रस्ता, हाँटेल मानराजची मागची बोळ, ग्यानचंद मेडीकल ते शामसुंदर काँम्पेल्क्स,जुनी अंजुम टाँकीज ते शिवाजी महाराज पुतळा, वरवाडे भागातील जामा मस्जीद परिसर, एकता चौक, भोगावती नदी,आंबेडकर चौक,भतवाल टाँकीज, राऊळ नगर चौफुली, मालपुर चौफुली, नंदुरबार चौफुली, दादावाडी विविध घरकुल तसेच गल्ली बोळात लाँऱ्या, टपऱ्या,चार चाकी वाहनांवर व्यापार-व्यवसाय थाटत. सार्वजनिक रहदारीच्या व खुल्या जागेवर कायमस्वरूपी अतिक्रमण केले जात आहे. यामुळे भविष्यात गावात अतिक्रमणाची मोठी समस्या होऊ पाहणाऱ्या ह्या विषयांकडे नगरपालिका प्रशासनाचे अक्ष्यम दुर्लक्ष दिसत आहे. नगरपालीकेने जर वेळेवरच गावात वाढत असलेल्या ह्या सार्वजनिक रस्त्यावरील लाँऱ्या, टपऱ्याकडे लक्ष दिले. तर भविष्यात शासनाचा अतिक्रमण काढण्याचा खर्च वाचून. आताच नगरपालिका उत्पन्नात वाढ दिसेल. म्हणून नगरपालीकेने स्वतः चे व्यापारी गाळ्यात सोयी सुविधा उपलब्ध करत. भाजीपाला लाँरी धारक यांचा प्रश्न दिलेल्या आश्वासनानुसार आजच्या तारखेत आठ दिवस झाल्यावर मार्गी लावायला पाहिजे. एवढीच रास्त मागणी हातावर पोट भरणारे लाँरीधारक वर्षानुवर्षापासुन करत आहे.
(उर्वरित पुढील भागात- नगरपालिका प्रशासनाने दिलेल्या आठ दिवसाच्या आश्वासनात काय केले…पोलीस अधिकाऱ्यांचा गावातून फेरफटका बंद का? दिलेले आश्वासन पुर्ण केले का?…)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here