पुण्यातील वडगाव शेरी भागात ऑक्सिजन गार्डन संकल्पनेतून उद्यान विकसित करणार

पुणे (प्रतिनिधी प्रसाद जयकर) : वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ वडगावशेरी स.न.30, जुना मुंढवा रोड..येथे नव्याने ऑक्सीजन गार्डन या संकल्पनेतून, पुणे मनपाच्या वतीने उद्यान विकसीत करण्यात येत आहे परीसरातील नागरीकांना सकाळी फिरण्यासाठी व त्यासोबतच स्वच्छ प्राणवायू मिळावा ही यामागची भूमिका आहे तथापि याच उद्यानालगत परीसरातील केरकचरा गोळाकरून साठविला जात असल्याने या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना आरोग्यदायी वातावरण लाभावे याकरीता

या परीसरात स्वच्छता राखणेबाबत मा सह संपर्क प्रमुख अजय भोसले, युवासेना उपसचिव किरण साळी, विस्तारक रुपेश कदम, शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे, शिवसेना समन्वयक राजू सावंत, संघटक विनोद करताल, यांच्या मार्गदर्शनानुसार वडगावशेरी युवासेनेकडून क्षेत्रिय कार्यालयाकडे दिनांक 29/07/2021 रोजी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.

vadgaon-sherivadgaon-sheri-swachata-abhiyan

तसेच तेथील परीसर कायमस्वरूपी स्वच्छ रहावा यासाठी स्वातंत्र्यदिनी तेथें झेंडावंदन करण्यात आले याप्रकारे युवासेना वडगावशेरी मतदारसंघाच्या वतीने परीसरातील नागरीकांच्या आरोग्याच्या हितासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे युवासेना विभाग समन्वयक शिवप्रसाद जठार वडगावशेरी मतदारसंघ, आशिष गायकवाड सामाजिक कार्यकर्ते, व छावा ग्रुप वडगावशेरी युवासैनिकांनी दाखवून दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here