‘ बेस्ट इनोव्हेशन अँवार्ड ‘चे वितरण

पुणे (पश्चिम महाराष्ट्र उपसंपादक सदानंद काळे) : महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या पै आयसीटी अँकॅडमीतर्फे १० विद्यार्थ्यांना ‘ बेस्ट इनोव्हेशन अँवार्ड ‘ देऊन गौरविण्यात आले.

डॉ. कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन ( रामेश्वर ) च्या रोबोटिक्स, सायबर सिक्युरिटी संबंधी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतल्याबद्दल त्यांना संस्थेचे अध्यक्ष डॉ.पी. ए. इनामदार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. वैजनाथ राऊत, मिलिंद चौधरी, राहुल शाह, संस्थेचे सहसचिव इरफान शेख, पै आयसीटी अँकॅडमीच्या संचालक अंजुम काजळेकर हे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here