मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) : नेहमी वादग्रस्त ट्विट करुन चर्चेत राहणाऱ्या कमाल आर. खान नेहमी कोणत्या ना कोण्या सेलिब्रेटीला ट्रोल करत असतो. आता त्याने अभिनेत्री कंगना राणावतच्या खासगी आयुष्यावर ट्विट केले. मात्र काही वेळातच त्याने हे ट्विट डिलीट केले. मात्र त्याच्या ट्विटमुळे पुन्हा नवा वाद उभा राहण्याची चिन्हे आहेत.
केआकरकेने त्याच्या ट्वीटमध्ये दावा केला की कंगना इम्रान नावाच्या व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. सोबतच त्याने कंगनाचे दोन फोटोही शेअर केले होते, त्यात कंगना एका पुरुषासोबत दिसत आहे. हे फोटो शेअर करत ‘ब्रेकिंग न्यूज- कंगना इम्रान नावाच्या एका इजिप्तच्या मुलासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. ताई हा तर लव्ह जिहाद आहे. तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती,’ अशा आशयाचे ट्वीट केले होते. मात्र, काही वेळातच केआरकेने हे ट्वीट डिलीट केलं.
दरम्यान, केआरकेने जे फोटो शेअर केले आहेत. त्या व्यक्तीसोबत कंगनाने देखील फोटो शेअर केला आहे. कंगनाने २८ जुलै रोजी हा फोटो शेअर केला होता. त्या फोटोत तिच व्यक्ती दिसत आहे. मात्र, कंगनाने त्या व्यक्तीचे नाव रिझवान असल्याचे सांगितले आहे.






