नवी दिल्ली : कोरोनामुळे ओमान आणि युएईमध्ये आयोजित करण्यात आलेली टी २० वर्ल्डकप स्पर्धा १७ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. अंतिम सामना १४ नोव्हेंबरला खेळला जाणार असून, भारत २४ ऑक्टोबरपासून आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. त्याचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध होईल.
ओमान आणि यूएई येथे खेळल्या जाणार्या या स्पर्धेच्या पहिल्या फेरीत आठ पात्र संघ सहभागी होणार आहेत. यातील चार संघ सुपर १२ फेरी गाठतील. २०१६ नंतरचा हा पहिला टी-२० वर्ल्डकप असेल. त्यावेळी वेस्ट इंडिजने इंग्लंडला पराभूत करून विजेतेपद जिंकले होते. सुपर-१०च्या गटातील सामन्यात भारताने पाकिस्तानला ६ गडी राखून पराभूत केले. उपांत्य सामन्यात भारताला विंडीजकडून पराभवाला सामोरे जावे लागले.
ICC has released the fixtures for T20 world cup.
Here are the dates for Indian fans, India will start the tournament with match against Pakistan. #T20WorldCup pic.twitter.com/cCWwGdClyx— All About Cricket (@allaboutcric_) August 17, 2021
टी-२० वर्ल्डकप स्पर्धेचे गट आधीच जाहीर झाले आहेत. पहिल्या फेरीत ८ संघ सुपर १२ मध्ये स्थान मिळवण्यासाठी खेळतील. आयर्लंड, नेदरलँड्स, श्रीलंका आणि नामिबियाला अ गटात, तर ओमान, पीएनजी, स्कॉटलंड आणि बांगलादेशला ब गटात स्थान देण्यात आले आहे. प्रत्येक गटातील फक्त अव्वल दोन संघ दुसऱ्या फेरीत प्रवेश करतील.






